Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य मराठी पत्रकार संघ तत्पर-प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे

najarkaid by najarkaid
July 7, 2020
in राज्य
0
पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य मराठी पत्रकार संघ तत्पर-प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे
ADVERTISEMENT

Spread the love

अकोला(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सर्व तालुका आणि गाव पातळीपर्यंत राज्य मराठी पत्रकार संघ कार्यरत असुन संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आणि शासनाकडून पत्रकारांना अधिक सवलती मिळाव्यात यासाठी सतत प्रयत्नशील असल्याची ग्वाही प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली. पत्रकारही समाजातील प्रमुख घटक असल्याने कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने या घटकालाही मदत करावी अशी मागणीही बैठकीत पुढे आली.
अकोला जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांची वेब बैठक मंगळवार दि. 7 जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी घेतली. यावेळी विदर्भ विभागीय उपाध्यक्ष संदीप पांडव, अमरावती विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ तायडे, अमरावती जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुशे, अकोला महानगर अध्यक्ष अमित कंधहार(देशमुख) यांच्यासह इतर पदाधिकारी व पत्रकार सहभागी झाले होते. सिद्धार्थ तायडे यांनी अमरावतीमधील कोरोनाची परिस्थिती आणि वृत्तपत्र माध्यमांसमोरील निर्माण झालेल्या अडचणी व संघटन पातळीवरील समस्या मांडल्या. इतर पदाधिकार्‍यांनीही कोरोनाच्या काळात टाळेबंदीमुळे जाहीरातीचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला असुन पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शासन स्तरावरुन मदत होण्याचे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तर अनेक ठिकाणी कोरोनाच्या काळात संघटनेच्या माध्यमातून अडचणीतील लोकांना मदतही करण्यात आल्याच्या उपक्रमाचे प्रदेशाध्यक्षांनी कौतुक केले. यावेळी बोलतांना वसंत मुंडे म्हणाले, कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष बैठका घेणे अशक्य असल्याने नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेब संवाद साधला जात आहे. महाराष्ट्रात राज्य मराठी पत्रकार संघ सर्व जिल्हे, शहर, तालुके आणि गाव पातळीपर्यंत कार्यरत आहे. लिहिते आणि सक्षम पत्रकारांमुळे संघटनेची विश्‍वासार्हता निर्माण झाली आहे. राज्यभरातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रसंगी संघर्ष करण्यासाठी राज्य पत्रकार संघ तत्पर असतो. कोरोनाच्या काळात पत्रकारांनी स्वतःची काळजी घेत सामाजिक स्वास्थ टिकवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या या माध्यम क्षेत्राला सरकारने व समाजानेही मदतीचा हात द्यावा यासाठी राज्य पत्रकार संघ प्रयत्न करत असल्याची ग्वाही दिली. यावेळी अकोला जिल्हा संघटक स्वाती सुरजुशे, दीपक गवई, बार्शी टाकळी तालुकाध्यक्ष प्रदीप गावंडे, बाळापूर तालुकाध्यक्ष पवन वानखेडे, उपाध्यक्ष झाकीर अहमद, अमोल कर्‍हे, सुरेश घ्यारे यांच्यासह अनेक पत्रकार व पदाधिकारी सहभागी झाले होते. पहिल्यांदाच नवीन तंत्रावर पत्रकारांशी संवाद करत उपयुक्त मार्गदर्शन करुन कोरोनाच्या काळातही पुन्हा उभारी घेण्याचा आत्मविश्‍वास प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांमध्ये निर्माण केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात आज १५६ बाधीत रुग्ण आढळले

Next Post

वीज बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
घरगुती वीजग्राहकांना जूनमधील वीजबिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत !

वीज बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us