Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक येथे मुथुट फायनान्स कंपनीवर ६ हल्लेखोरांचा सशस्त्र दरोडा 

najarkaid by najarkaid
June 14, 2019
in राज्य
0
नाशिक येथे मुथुट फायनान्स कंपनीवर ६ हल्लेखोरांचा सशस्त्र दरोडा 
ADVERTISEMENT

Spread the love

 दरोडेखोरांच्या हल्ल्यात १ जण ठार ; ३ जण जखमी 
नाशिक;-  उंटवाडी येथील मुत्थुट फायनान्सच्या कार्यालयात सहा दरोडेखोरांनी आज धुडगूस घातला. या कार्यालयात लूटमार करतानाच दरोडेखोरांनी गोळीबार करत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. त्यात कार्यालयातील एक कर्मचारी ठार झाला असून तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. भरदिवसा दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

उंटवाडी येथे मुत्थुट फायनान्सचं कार्यालय आहे. आज सकाळी सहा दरोडेखोरांनी मुत्थुट फायनान्सच्या कार्यालयात प्रवेश करत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यातील दोन दरोडेखोरांच्या चेहऱ्याला मास्क लावलेले होते. चौघांच्या हातात पिस्तुल आणि दोघांच्या हातात कुऱ्हाडी होत्या. या दरोडेखोरांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी केली असता सजू स्याम्युअल यांनी त्याला विरोध करताच एका दरोडेखोराने स्याम्युअल यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर कार्यालयातील एकाच्या डोक्यावर बंदुकीच्या बटाने प्रहार करत व्यवस्थापकालाही मारहाण केली. या हल्ल्यात चंद्रशेखर देशपांडे आणि कैलास जैन हे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरोडेखोरांकडून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू असतानाच सुरक्षा रक्षकाने सायरन वाजविल्याने चिडलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करत तिथून पलायन केलं. या दरोडेखोरांच्या हाती काहीही लागलं नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक याप्रकरणी कसून तपास करत आहे. दरम्यान, दिवसाढवळ्या दरोडेखोरांनी धुडगूस घातल्याने नाशिक शहर हादरून गेलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खा. उन्मेष पाटील यांचा बदरखे ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार

Next Post

धनंजय मुंडेंना दिलासा,सुप्रीम कोर्टाने दिली  आदेशास स्थगिती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
धनंजय मुंडेंना दिलासा,सुप्रीम कोर्टाने दिली  आदेशास स्थगिती

धनंजय मुंडेंना दिलासा,सुप्रीम कोर्टाने दिली  आदेशास स्थगिती

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us