Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. केतकीताई पाटील यांनी अयोध्येतील रामल्लाचे दर्शन घेऊन श्रीराम कथेचे  केले श्रवण

najarkaid by najarkaid
August 22, 2024
in Uncategorized
0
डॉ. केतकीताई पाटील यांनी अयोध्येतील रामल्लाचे दर्शन घेऊन श्रीराम कथेचे  केले श्रवण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम कथा महोत्सव नुकताच अयोध्या नगरीत हजारो भक्त गणाच्या उपस्थितीत पार पडला. या महोत्सवाच्या सांगता समारोहात अर्थात काल्याच्या कीर्तनाप्रसंगी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील ह्या सहभागी झाल्या. या प्रसंगी उपस्थित संत महात्म्यांचे आशीर्वाद घेतले, महाआरती देखील केली. तसेच प्रभू श्रीराम यांचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या प्रसंगी जय श्रीराम, जय श्रीराम गजराने परिसर राममय झाला.

आदिशक्ती श्री संतश्रेष्ठ मुक्ताई यांच्या आशीर्वादाने व भगवान श्री कुंडलेश्वर प्रासादिक सद्गुरू झेंडूजी महाराज बेळीकर दिंडी परंपरा फड पुरस्कृत मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच दिव्य श्रीराम कथा महोत्सव  अयोध्या येथील श्री मणीरामदास छावणी येथे आयोजित करण्यात आला होता. १३ ते २१ ऑगस्ट २०२४ ह्या कालावधीत हा महोत्सव उत्साहात झाला. बुधवार दिनांक २१ रोजी या सप्ताहाची काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. या प्रसंगी डॉ केतकी ताई पाटील ह्या डॉ अनिकेत पाटील ह्यांच्यासह उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा लाभ त्यांनी घेतला.

यावेळी  विश्व हिंदू परीषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा श्रीराम जन्मभूमी मंदिराचे महामंत्री श्री चपंतरायजी महाराज, श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्यनारायणजी महाराज, आचार्य मल्लिकार्जुन महाराज, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, काशी येथील विष्णु शास्त्री महाराज, हभप नरहरी महाराज आळंदी, हभप भरत जी महाराज श्री क्षेत्र कुंडलेश्वर, पाल येथील प्रतिनिधी दिव्य चैतन्यजी महाराज, ब्रज चैतन्य जी महाराज यांची उपस्थित होती. कथा महोत्सवासाठी सहभागी झाल्याबद्दल हभप भरत महाराज यांनी डॉ केतकी ताई पाटील यांना श्री ज्ञानेश्वरी भेट देऊन सन्मानित केले. या प्रसंगी भाऊ डॉ अनिकेत पाटील यांनी देखील भरत महाराज यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थितांसमवेत डॉ केतकी ताई पाटील व डॉ अनिकेत पाटील यांनी महाआरती केली.

यावेळी भुसावळ चे आमदार संजय सावकारे, जिल्हा महामंत्री परीक्षित बऱ्हाटे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष निळकंठ भारंबे, जळगाव येथील माजी नगराध्यक्ष बंडू काळे, भाजपचे विधान सभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, रावेर तालुका सर चिटणीस दुर्गेश पाटील, भुसावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मुरलीधर पाटील, सभापती अनिल वारके, किरण महाजन यांच्यासह महाराष्ट्र शासन मंत्रालयाचे डॉ विजय महाजन तसेच  सामाजिक क्षेत्रातील भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन हभप दीपक महाराज शेळगावकर यांनी तर आभार प्रदर्शन नितीन भोळे यांनी केले. यावेळी हजारो महिला पुरुष भाविकांनी मुक्कामी राहून कथा, कीर्तन श्रवण केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव विमानतळ पासून इतक्या अंतरावर ‘नो फ्लाईंग झोन’ ; या कारणास्तव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आदेश

Next Post

मागास वर्गीय सेनेच्या तालुका प्रमुख पदी अनिता चिमणकारे

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
मागास वर्गीय सेनेच्या तालुका प्रमुख पदी अनिता चिमणकारे

मागास वर्गीय सेनेच्या तालुका प्रमुख पदी अनिता चिमणकारे

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us