Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 96.57 टक्क्यांवर

najarkaid by najarkaid
June 11, 2021
in Uncategorized
0
दुसऱ्या लाटेत राज्यात कोविडचा मोठ्या प्रमाणात फैलाव ;पर्यायी उपचारपद्धती राबविण्याबाबत चाचपणी सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

•जिल्ह्यात 1 लाख 36 हजार 442 रुग्णांची कोरोनावर मात.
•जिल्ह्यात आजपर्यंत 12 लाख 28 हजार 864 संशयितांची कोरोना चाचणी.
•जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 288, पैकी लक्षणे असलेले अवघे 585 रुग्ण.

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 11 – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या 1 लाख 41 हजार 289 रुग्णांपैकी 1 लाख 36 हजार 442 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.57 टक्क्यांवर पोहोचले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असली तरी नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी प्रशासनाने राबविलेल्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान व इतर उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्यावर पोहोचले होते. मात्र जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर 10 फेब्रुवारीपासून हे प्रमाण कमी झाले तर 31 मार्च रोजी हे प्रमाण 84.92 टक्क्यांपर्यत खाली आले होते. परंतु त्यानंतरच्या काळात जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी आरोग्य, पोलीस, जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने अधिक प्रभावीपणे उपाययोजना राबवित बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या वाढविल्या होत्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.57 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत. शिवाय मृत्यु कमी करण्यातही आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाची साखळ खंडित करण्यासाठी आजपर्यंत 12 लाख 28 हजार 864 कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 लाख 41 हजार 289 अहवाल पॉझिटीव्ह तर 10 लाख 84 हजार 740 अहवाल निगेटिव्ह आले आहे तर सध्या 980 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही कमी होत आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत 1 हजार 628 व्यक्ति होम क्वारंटाईन असून 155 व्यक्ति विलगीकरण कक्षात आहेत. जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 2 हजार 288 रुग्णांपैकी 1 हजार 703 रुग्ण लक्षणे नसलेले तर 585 रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी 329 रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु असून 152 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
00000

Spread the love
Tags: #CoronaInMaharashtra
ADVERTISEMENT
Previous Post

बोदवड , सावदा व मुक्ताईनगर बस स्थानकांचे नूतनीकरण व विस्तारीकरणच्या कामांना मंजुरी मिळावी

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस च्या नूतन शहर महिला जिल्हाध्यक्ष सौ मंगलाताई पाटील यांचा सत्कार

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस च्या नूतन शहर महिला जिल्हाध्यक्ष सौ मंगलाताई पाटील यांचा सत्कार

राष्ट्रवादी काँग्रेस च्या नूतन शहर महिला जिल्हाध्यक्ष सौ मंगलाताई पाटील यांचा सत्कार

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us