Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात केळी पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती ; जाणून घ्या

थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे

najarkaid by najarkaid
February 1, 2022
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यात केळी पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती ; जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि. 1 (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्हयात केळी हे प्रमुख पिक असून सदद्यस्थितीत तापमान कमी – कमी होत असून त्याचे केळी पिकावर विपरीत परिणाम होत आहे. केळीच्या चांगल्या वाढीसाठी तापमान 16 ते 30 सें. ग्रे. यादरम्यान असावे कमी तापमानाचा कंद उगवण, मुळयांची वाढ, मुळयांची कार्यक्षमता, पाने येण्याचा वेग, पानावर चट्टे येणे, झाडांची वाढ मंदावणे, फळांची वाढ मंदावणे, फळपक्वतेस येण्याचा कालावधी वाढणे, केळी पिकण्याची क्रिया मंदावणे, इत्यादी दृष्य व अदृष्य परिणाम होतात.

सद्यस्थितीत मागील वर्षी ऑक्टोंबर मध्ये लागवड केलेली कांदेबाग काढणीच्या अवस्थेत, या वर्षी मार्च – एप्रिल महिन्यात लागवड केलेली बाग फळवाढीच्या अवस्थेत व या वर्षी जून महिन्यात लागवड केलेली बाग शाखीय वाढीची अवस्था संपवून निसवण्याच्या अवस्थेत आहेत. केळीच्या या सर्व अवस्था कमी तापमानास अत्यंत संवेदनशील असून केळीच्या चांगल्या वाढीसाठी तसेच उत्पादन व गुणवत्तेसाठी  योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने थंडीच्या काळात केळी पिकातील व्यवस्थापन कसे करावे.

यासंदर्भातील खालील माहिती शेतकरी बांधवांमध्ये जगजागृती करण्यात यावी या उद्देशाने, नविन लागवडीच्या बागेत कुळवाच्या पाळया देवून बागेतील माती भुसभुशीत ठेवावी, बागा तणमुक्त ठेवाव्यात व मुख्य झाडाशेजारीत पिल्ले नियमित कापावीत, बागेतील मुख्य झाडाचे कोणतेही पान कापु नये, फक्त रोगगस्त पानांचा भाग काढावा व बागेबाहेर नेवून नष्ट करावा, झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रति झाड 250 ते 750 ग्रॅम निंबोळी ढेप द्यावी, शक्य असल्यास बागेत सेंद्रिय आच्छादन करावे, रासायनिक खताच्या मात्रा वेळापत्रकानुसार द्याव्यात,

थंडीच्या दिवसात केळीस रात्रीच्या वेळेस पाणी पुरवठा करावा, सकाळी भल्या पहाटे ओलसर काडी कचरा पेटवून बागेच्या चारही बाजूस धुर करावा, बागेभोवती संजीव कुंपण असावे, नसल्यास पळकाडयाच्या झापा करुन किंवा 50 टक्के शेडनेट वापरुन वारा रोधक कुंपण करावे, घड व्यवस्थापनात केळी फुल कापावेत, घडावर इच्छित फण्या ठेवून बाकीच्या फण्यांची विरळणी करावी, घडावर फुलकिडींच्या नियंत्रणासाठी व घडातील केळी फळांच्या वाढीसाठी अनुक्रमे व्हर्टीसिलियम लेकॅन ( 3 ग्रॅम / लिटर) व 0.5 टक्के पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट + 1 टक्के युरियाची फवारणी करावी.

घडावर कोरडया केळी पानांचे किंवा 100 गेज जाडीच्या, 2-6 टक्के सच्छिद्रतेच्या पॉलीप्रापिलिनच्या स्कर्टिंग बॅगांचे आवारण करावे,  काढणी झालेल्या सर्व झाडांवरील पाने कापावीत, यामुळे त्यांची वाढ होत नाही व जमिनीतुन अन्नद्रव्ये घेतली जात नाहीत, बागेत काही वेळा सुक्ष्म अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे दिसून येतात अशा वेळेस सुक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीतुन किंवा ठिबकव्दारे द्यावीत, बागेतील विषाणूजन्य रोगट झाडे समुळ नष्ट करावीत, रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून शिफारशीत आंतरप्रवाही किडीशकांची फवारणी घ्यावी,  बागेत करपा किंवा सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कार्बेन्डेझिम 10 ग्रॅम किंवा प्रोपिकोन्याझॉल 10 ग्रॅम किंवा ट्रॉयडेमार्क 10 ग्रॅम या बुरशीनाशकाची 10 लीटर पाण्यात स्टिकरसह मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. पहिल्या फवारणी नंतर 7 ते 21 दिवसांच्या अंतराने रोगाच्या तीव्रतेनुसार 3 ते 4 फवारण्या घ्यावात.

तसेच सुरवातीच्या फवारण्या नंतर रोगाच्या तीव्रतेनुसार प्रति 10 लीटर पाण्यात प्रोपिकोन्याझॉल 5 मि.ली. किंवा कार्बेन्डेझिम 5 ग्रॅम +  100 मि.ली मिनरल ऑइलच्या 2 ते 3 फवारण्या दर 2 ते 3 आठवडयाच्या अंतराने कराव्यात, अशा पध्दतीने व्यवस्थापन केल्यास कमी तापमानाचा होणारा परिणाम कमी होतो व नुकसानीची तिव्रता कमी होते 19, 19, 19 विद्रव्य खत प्रति लिटर 2-3 M या प्रमाणे फवारणी करावी. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्व्ये कळविले आहे.

Spread the love
Tags: केळी पिक
ADVERTISEMENT
Previous Post

मनुका जास्त प्रमाणात खाल्ल्याने होतात हे नुकसान, जाणून घ्या

Next Post

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा ; ८ ते १० लाखापर्यंत मिळेल अनुदान

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्यावा ; ८ ते १० लाखापर्यंत मिळेल अनुदान

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'या' योजनेचा लाभ घ्यावा ; ८ ते १० लाखापर्यंत मिळेल अनुदान

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us