Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गरज भासल्यास 1971 सारखा हल्ला’- राजनाथ सिंह

najarkaid by najarkaid
September 29, 2019
in राष्ट्रीय
0
गरज भासल्यास 1971 सारखा हल्ला’- राजनाथ सिंह
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-’पाकिस्तानकडून 26/11 सारखा हल्ला मुंबईच्या किनारपट्टीवर करण्याचा विचार सुरू आहे. पण त्यांचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. गरज भासल्यास 1971 मध्ये पाकिस्तानी नौदलावर केलेल्या हल्ल्यापेक्षा अधिक जोरदार हल्ला करू. आज ताफ्यात आलेल्या आयएनएस खांदेरीमुळे हा हल्ला करण्याची नौदलाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, हे पाकिस्तानने ध्यानात घ्यावे’, असा थेट इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी दिला. ’आयएनएस खांदेरी’ या पाणबुडीच्या नौदल गोदीतील ’कमिशनिंग’ कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
संरक्षण मंत्र्यांनी यावेळी सागरी सुरक्षेचे महत्त्व मांडले. ते म्हणाले, ’अरबी समुद्र व हिंदी महासागराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या भागात शांतता भंग करण्याचा प्रयत्न काही शक्तींकडून होत आहे. पण असा प्रयत्न झाल्यास नौदल पूर्ण क्षमतेने त्याचे उत्तर देईल. पण शांतताप्रिय देशांना भारतीय नौदलाकडून कोणताही धोका नाही.’
’भारतीय नौदलाने अरबी समुद्रात चाच्यांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेमुळे आज तेथून जलवाहतूक करणार्‍या मालवाहू जहाजांना संरक्षण मिळाले आहे. परिणामी त्यांचा विमा खर्च कमी झाला आहे. यापुढेही देशाच्या सुरक्षेसाठी सशस्त्र दलांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असेल. आगामी आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारकडून मोठे निर्णय घेतले जातील’, असे संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.
नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह म्हणाले, ’नौदलाने एकूण भांडवली खर्चापैकी मेक इन इंडियाअंतर्गत 70 टक्के स्वदेशीकरणावर खर्च केले आहेत. खांदेरीसारख्या स्कॉर्पिअन श्रेणीतील पाणबुडीच्या बांधणीसह 80 टक्के काम भारतीय कंपन्यांना देण्यात आले आहे. त्याद्वारे 1.75 लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. सध्याच्या क्लिष्ट अशा आंतरराष्ट्रीय परिस्थितीत खांदेरीची ताकद ही भारताच्या समुद्री हिताच्या रक्षणाची ताकद वाढविणारी आहे.’
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत, संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल पी. अजित कुमार, युद्धनौका उत्पादन विभागाचे नियंत्रक व्हाइस अ‍ॅडमिरल ए. के. सक्सेना, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे अध्यक्ष कमोडोर (निवृत्त) राकेश आनंद, आयएनएस खांदेरीचे कॅप्टन दलबीर सिंह यांच्यासह नौदल, हवाई दल तसेच लष्करातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
’पाक पंतप्रधान व्यंगचित्राचा विषय’- ’दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारतीय पंतप्रधानांच्या प्रयत्नांचे जगभर कौतुक होत आहे. दुसरीकडे पाकिस्तानी पंतप्रधान मात्र जगभर दरवाजे वाजवत फिरत आहेत. त्याद्वारे ते व्यंगचित्रकारांसाठी एक विषय झाले आहेत’, अशी कोपरखळी यावेळी संरक्षण मंत्र्यांनी मारली.
’शिवाजी महाराजांचे आरमार स्वप्न पूर्ण करूया’
’छत्रपती शिवाजी महाराजांनी खाडी भागात आरमार उभे केले. जगभरातील मोठ्या महासागरात नौका चालविण्याचे त्यांचे स्वप्न होते. सध्या भारतीय नौदल उथळ समुद्रात आहे. खांदेरीसारख्या नौकांमुळे आता छत्रपती शिवरायांचे हे स्वप्न साकार करण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे’, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिज्बुलचा म्होरक्या ओसामा रामबन चकमकीत ठार

Next Post

नाकाबंदीत एक कोटींची रोकड जप्त; 9 अटकेत

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
नाकाबंदीत एक कोटींची रोकड जप्त; 9 अटकेत

नाकाबंदीत एक कोटींची रोकड जप्त; 9 अटकेत

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us