जळगाव – घरात बोलावून सहा-सात वर्षाच्या दोन सख्ख्या चुलत बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या राज संतोष कोळी (१९, रा. जळगाव खुर्द) या तरुणाला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.त्याला १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांनी दिला आहे.
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
जळगावातील हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ; दोघा आरोपिंना घेतले ताब्यात
१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
जळगावात एकाचा निघृण खून ; घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
राज कोळी याने २० ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घराजवळील दोन सख्ख्या चुलत बहिणींना घरात बोलावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. एका चिमुरडीने हा घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्यावर याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात त्याच दिवशी भादंवि कलम ३७५६५ एबी तसेच पोक्सोचे कलम ४, ६, ८ व १० नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एन. राजूरकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकार पक्षातर्फ अतिरिक्त शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी काम पाहिले. यात सात साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात दोन्ही पीडित बालिकांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. जिल्हा सत्र न्यायालयाने सरकार पक्षाचा पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी राज कोळी यास बुधवारी शिक्षा ठोठावली.
बा.ले.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ६ अन्वये २० वर्षे सक्षम कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.
बा.ले.अ.प्र.अधिनियम २०१२ चे कलम १० अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावासाची शिक्षा









