जळगाव, (प्रतिनिधी)- यकृत डिटॉक्स वर्षातून एकदा योग्य आहाराने करता येते, यकृत शरीरातील महत्वाचा घटक असून यकृत पाचशे पेक्षा अधिक गोष्टींसाठी कार्य करत असल्याची माहिती अशोक मंधवानी यांनी आज दिनांक 21 मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना अशोक मंधान पुढे म्हणाले की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला असून माझे उच्च माध्यामिक शिक्षण एम.जे. कॉलेज येथे झालेले आहे. मी शिक्षण घेत असताना परिस्थिती नाजूक असल्याकारणाने मला इतरत्र जॉब करावा लागायचा. मी कपडे विक्री, गृहोपयोगी वस्तूंचा व्यवसाय देखील घरोघरी विक्री करून केला. मी जुलै २०२१ मध्ये आयुर्वेदात पहिली डॉक्टरेट सेलींग कंपनी सुरू केली. मला कुठलाही अनुभव नसल्याने मला लोकांनी नाकारले. त्यामुळे मी आयुर्वेदीक शिक्षण घेण्याचे ठरवले. मी अतुरीपथाच्या शोधात होतो. परिस्थिती हलाखीची असल्याने चांगली संस्था किंवा कॉलेजला अॅडमिशन घेऊ शकत नव्हतो. नोव्हेंबर २०२२ मध्ये मला माझ्या गुरुजींशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की तु आयुर्वेदाचे शिक्षण का घेत नाही? तेव्हा मी सर्वांगीण उपचार म्हणून ऑनलाईन कोर्स शिकू लागलो. व्यवसायात तोटा झाल्याने माझी परिस्थिती चांगली नव्हती. कोविड महामारीमध्ये माझ्या पत्नीने मला पाठींबा दिला. तीने तिचे सोने विकून मला ते पैसे दिले. मी दोन वर्षात माझे डी. एन. वाय.एस चे शिक्षण पुर्ण केले. भारतात फक्त ३९ लोकांनी हे शिक्षण पुर्ण केलेले आहे. शिक्षण पुर्ण केल्यावर मला लिवर डिटॉक्ससाठी इंडीया ऑफ रिकॉर्डस् व्दारा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. माझ्या गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली स्टूलव्दारे (विष्ठा) यकृतातील खडे काढून यश मिळवले. यकृत हा आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. कारण तो ५०० पेक्षा अधिक कार्य करतो त्यामुळे यकृत निरोगी ठेवणे खुप महत्त्वाचे आहे. आपण जे काही खातो पितो शरीरात कुठे पाठवायचे हे यकृत ठरवते. यकृतामधील खाडे काढल्यानंतर आपल्याला अॅसिडीटी, अपचन, उच्च रक्तदाब, संधीवात, पाठदुखी, स्त्रीयांचे मासिक पाळींचे समस्या यामधून आपल्याला सुटका मिळते. यकृत डिटॉक्स करण्यासाठी आपण आयुर्वेदातील उच्च दर्जाच्या हर्बल उत्पादकांची मदत घेतो आणि मुख्य भूमिका जीवनशैली आणि आहाराची असते. त्यामुळे व्यक्तीच्या स्थितीनुसार यकृत डिटॉक्स करण्यासाठी ५ ते ६ महिने लागतात. ज्यांना निरोगी रहायचे आहे ते करू शकतात आणि यकृत डिटॉक्स केल्यानंतर, एक ते दोन वर्षे आपले यकृताचे आरोग्य वाढते. कारण यकृत डिटॉक्स वर्षातून एकदा योग्य आहाराने करता येते.










