मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- नुकताच इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाला असून संत मुक्ताबाई महाविद्यालय मुक्ताईनगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु,श्रुती सचिनसिंह ठाकोर ही एच,एस,सी,बोर्ड विज्ञान शाखेतून 87,50%गुण मिळवून महाविद्यालयामधून प्रथम क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाली आहे.दरम्यान १० वी च्या परीक्षेत सुद्धा श्रुती जिल्ह्यात प्रथम तर राज्यात दुसरी आली आली होती. तीच्या या यशाबद्दल राजपूत समाज मुक्ताईनगर चे वतीने व श्री राष्ट्रीय करणी सेनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
श्रुती व वडील ठाकोर सर यांचा सत्कार करतांना जे,ई,स्कूल चे संचालक रमेश खाचने ,मुक्ताईनगर चे उद्योजक कोमलसिंह राजपूत ,श्री.राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग प्रमुख विलाससिंह पाटील,श्री बाविस्कर सर, आय. जी पाटील सर ,भूषनसिंह राजपूत रोशनसिंह राजपूत ,(संचालक मुक्ताई जिनिंग् मुक्ताईनगर ,) उपस्थित होते,










