जळगाव,(प्रतिनिधी)- देशात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होतं असून चौथ्या टप्प्यात देशातील एकूण ९६ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे दरम्यान यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाचा समावेश असून सकाळी ७ वाजता मतदानाला सुरवात झाली आहे. भाजपाचे दिग्गज नेते मंत्री गिरीश महाजन यांनी कुटुंबसमवेत जामनेर येथे मतदानाचा हक्क बजावला असून यावेळी त्यांनी सामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहत मतदानाचा हक्क बजावला.


मंत्री गिरीश महाजन यांनी मतदान केल्यानंतर ‘x’ वर पोस्ट करून आपण मतदान केल्याची माहिती दिली असून पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलं आहे की,लोकशाहीच्या पवित्र उत्सवात सहभागी होत आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
सर्व नागरिकांनी मतदान करून लोकशाहीला समृध्द करावे असे आवाहन यावेळी केले आहे.


चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान
राज्यातील पुणे, शिरूर, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, शिर्डी, मावळ, जळगाव, रावेर, बीड आणि नंदुरबारमध्ये आज मतदान पार पडत आहे.










