Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बालकल्याण समितीच्या बरखास्तीसाठी तिन दिवसापासुन साखळी उपोषण सुरू ; २२ पासुन अन्न त्याग उपोषण करणार

najarkaid by najarkaid
January 21, 2024
in जळगाव
0
बालकल्याण समितीच्या बरखास्तीसाठी तिन दिवसापासुन साखळी उपोषण सुरू ; २२ पासुन अन्न त्याग उपोषण करणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – (प्रतिनिधी) – खडके बालगृहातील अत्याचार प्रकरणी बालकल्याण समितीच्या बरखास्तीसाठी गेल्या तिन दिवसापासुन महाराष्ट्र स्टुडंस युनियनचे राज्य उपाध्यक्ष ऍड. दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, महानगराध्यक्ष प्रथमेश मराठे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू असून आज दिनांक 22 पासून पासुन अन्न त्याग उपोषण करणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी कळविले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,महिला व बालविकास विभाग यांच्या कडे अत्यंत गंभीर स्वरुपाची तक्रार दिनांक २९/१२/२०२३ रोजी सादर करण्यात आली आहे.बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम २७ प्रमाणे बाल कल्याण समिती, जळगांव कार्यरत आहे.
मिशन वात्सल्य गाईडलाईन नुसार समिती सदस्यांना तसेच अध्यक्ष
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम २७ (७)(१)नुसार जर कोणताही सदस्य या अधिनियमानुसार त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा गैर वापर करत असल्याचे सिद्ध झाल्यास राज्य शासनाकडुन अशा सदस्यांचे सदस्यत्व चौकशी नतंर रद्द केले जाईल, असे सदर अधिनियमात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे.
वृत्तपत्रातील प्रसिद्ध झालेल्या बातम्या नुसार सदर जळगाव च्या बाल कल्याण समितीतील तीन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन सदर सदस्यांची राज्य चौकशी समितीद्वारे ऑगस्ट – २०२३ महिन्यातच चौकशी पुर्ण झालेली आहे.
खडके बालगृहाची अत्याचार प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशन ता. एरंडोल जि. जळगाव येथे दिनांक २६.०७.२०२३ रोजी गुन्हा दाखल झालेला आहे.
खडके बालगृह अत्याचार प्रकरणाची माहिती पिडितांनी अध्यक्ष व दोन सदस्य बाल कल्याण समिती, जळगाव यांना सर्वप्रथम दिली होती.
एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याच्या ६ महिने अगोदर या संपूर्ण प्रकरणाची माहिती पिडितांनी बाल कल्याण समिती अध्यक्ष /सदस्य १)अध्यक्ष श्रीमती देवयानी गोविंदवार २) सदस्य श्रीमती विद्या बोरनारे
३)सदस्य श्री. संदिप पाटील
यांना घटनाक्रम माहिती होता.
सदर व्यक्तींवर दाखल गुन्ह्याचा तपशील – भा. द. वि. कलम ३२४,३५४,३७६(२)(n)(क),३२३,५०६, पोस्को कायदा २०१२ अंतर्गत ४,५(फ) (एल) (ओ) ,६,८,९(फ)(एल)(ओ) ,१९,२१,८२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

जळगाव जिल्ह्यातील खडके, ता. एरंडोल येथे संस्थेच्या माध्यमातून खाजगी रित्या चालवल्या जाणाऱ्या कै. य. ब. पाटील, मुलींचे बालगृह, खडके येथील मुलींच्या बालगृहात लैंगिक शोषणाची गंभीर स्वरुपाची घटनेची तक्रार बाल कल्याण समिती, जळगाव येथील तीन अध्यक्ष /सदस्य, अध्यक्ष श्रीमती देवयानी गोविंदवार, सदस्य श्रीमती विद्या बोरनारे व सदस्य श्री. संदीप पाटील यांना पिडीत बालिकांनी ऑगस्ट २०२२ मध्ये सर्व प्रथम सांगितली होती.
ज्या बाल कल्याण समितीतील अध्यक्ष व सदस्य यांना या समितीवर पिडीत बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी नियुक्त केलेले असतांना अशा प्रकारे अतिशय गंभीर स्वरुपाची लैंगिक शोषण व अत्याचाराची घटना यांना माहिती होऊन देखील यांनी याची दखल घेऊन संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला नाही यावरुन यांच्या कामाची तत्परता व बालकांबाबत असलेली सहानुभूती स्पष्ट होते.
तसे पाहता या अध्यक्ष महोदय व दोन सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असतांना यांच्या कामाचा सर्व भोगंळ कारभार जगजाहीर झालेला आहे तरीही अद्याप यांची येथुन हकालपट्टी का होत नाही ? हा मात्र सर्वांसाठीच संशोधनाचा विषय ठरला असल्याचं महाराष्ट्र स्टुडंट युनियन म्हटलं आहे.

*उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या*
१) पोक्सो अतंर्गत सर्व प्रथम गुन्ह्याची माहिती असतांना देखील त्याचवेळी गुन्हा दाखल न करता आरोपीची पाठराखण करत सदर बाब अनेक दिवस दाबुन ठेवणाऱ्या महाशय असणारे बाल कल्याण समितीतीचे १)अध्यक्ष – श्रीमती देवयानी गोविंदवार
२) सदस्य – श्रीमती विद्या बोरणार
३) सदस्य – श्री. संदिप पाटील या तिनही महाशयांचे तात्काळ निलबंन करण्यात यावे.

२) बाल कल्याण समितीतील अध्यक्ष /सदस्य ही समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी.
३) या तीन महाशयांना या पुढे शासनस्तरावर कोणत्याही शासकीय समितीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात येवु नये.
४) या तीन महाशयांना बालकल्याण समिती येथे येण्यास प्रतिबंध करण्यात यावा.

या तिन महाशयांनी पदाचा गैरवापर केलेला
आहे, त्यामुळे बाल कल्याण समितीतील अध्यक्ष व दोन सदस्य यांना बालकल्याण समितीच्या पदावरुन तात्काळ पदमुक्त करण्यात यावे. सदर गुन्हे दाखल असलेल्या बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बरखास्तीची कार्यवाही होण्यास टाळाटाळ होत आहे त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला बेमुदत साखळी उपोषण करण्याऐवजी अन्न त्याग उपोषण सुरू करावे लागत आहे याची आपण कृपया नोंद घ्यावी तसेच आपण जोपर्यंत सदर समितीतील अध्यक्ष व दोन सदस्य यांना निलंबित करित नाहीत तोपर्यंत आमचे अन्न त्याग उपोषण सुरू राहणार आहे याची आपण व आपल्या महिला व बालविकास विभागाने नोंद घ्यावी.
सदर तक्रारीची गांभिर्याने दखल घेण्याची विनंती महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतिने करण्यात आली होती. प्रशासनाने अद्याप ही तक्रारीची दखल घेतलेली नसल्या कारणाने दिनांक १९/०१ /२०२४ पासुन बेमुदत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. तीन दिवस उलटुन गेलेत तरी देखील राज्य शासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आम्ही दिनांक २२/०१/२०२४ रोजी सकाळी ९:०० वाजेपासून अन्न त्याग उपोषण करणार आहोत असे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे राज्य उपाध्यक्ष ॲड. दिपक अरुण सपकाळे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात १५ हजार चौरसफुटात भव्य रांगोळीतून साकारले प्रभू श्रीरामाचे चित्र

Next Post

कार सेवेला गेल्याचा हा घ्या पुरावा ; देवेंद्र फडणवीसांनी ३०वर्षे जुनं वर्तमान पत्रात छापून आलेला फोटो केला शेअर

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
कार सेवेला गेल्याचा हा घ्या पुरावा ; देवेंद्र फडणवीसांनी ३०वर्षे जुनं वर्तमान पत्रात छापून आलेला फोटो केला शेअर

कार सेवेला गेल्याचा हा घ्या पुरावा ; देवेंद्र फडणवीसांनी ३०वर्षे जुनं वर्तमान पत्रात छापून आलेला फोटो केला शेअर

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us