पाचोरा(किशोर रायसाकडा)— येथिल ग्रामिण रूग्णालयात प्रसुतीकळेच्या वेदना सहन करणार्या महीलेला “तुमचे बाळतपण येथे होणे शक्य नाही.तुम्ही गावातिल खाजगी रूग्णालयात जा” असा मोल्यवान सल्ला दिला.नातेवाईकांनी रूग्णवाहीका मागीतली असता तीपण देण्याचे नाकारले. अशा परिस्थितीत “त्या”प्रसुती कळा सहन करत बाळाला जन्म घालण्याची प्रक्रिया सुरू असतांना रिक्षाने शहरातिल दोन खाजगी दवाखाने फिरून वृंदावन हाॅस्पिटलमध्ये शस्ञकियेद्वारे मुलीला जन्म दिला.या संपुर्ण कालावधित नवजात बाळाला श्वास घेण्यास ञास होत असल्याने त्याला काचेच्या पेटीत उपचार सुरू असुन आई बरी आहे माञ बाळाची प्रकृती काळजी घेण्यासारखी आहे.पाचोरा ग्रामिण रूग्णालयातिल राञीच्या वेळस कर्तव्यावर असणार्या कर्मच्यार्यांच्या माणुसकीला काळीमा फासणार्या या कृत्या विरूध्द बाळाच्या बापाने आवाज उठवित ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली असुन बाळ व बाळतिंन याच्या जिवीतास धोका निर्माण करणार्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,पाचोरा तालुक्याच्या सिमेलगत सोयगाव तालुक्यातिल पोहरी येथिल
विशाल बापू निकम याने दिलेली तक्रार अशी की, पत्नी अंकीता विशाल निकम (वय २५) रा. पोहरी ही गर्भवती होती. तिचे ९ महिने ४ दिवस पुर्ण झाल्यानंतर दिनांक २३ एप्रील रोजी तिच्या पोटात प्रसुतीकळा सुरु झाल्या. मी माझे वडील आम्ही गाडी करुन ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे सायंकाळी ५ वाजता पोहचलो. रुग्णालयात सेवेत असलेल्या डॉक्टर व महिला कर्मचारी यांनी येथे बाळांतपण होवून जाईल असे सांगत बाहेरुन औषध आणण्यास सांगीतले. माझे वडील बापू गोमा निकम यांनी आनंद मेडीकल येथून चार इंजेक्शन घेवून आले. रात्री १० वाजेच्या सुमारास माझ्या पत्नीला त्रास जाणवला. तिच्या गर्भातून बाळाचे डोके बाहेर आले असता, सेवेत हजर असलेल्या डॉक्टर व महिला कर्मचारी यांनी बाळातंपण येथे होणार नाही तुम्ही पाचोऱ्यातील खाजगी दवाखान्यात घेवून जा असे सांगीतले. मी त्यांना रुग्णवाहिका मागीतली असता ती त्यांनी दिली नाही. मी विनंती करुनही मला गाडी दिली नाही. मी छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन रिक्षा मागवुन माझ्या पत्नीला होती त्या अवस्थेत शहरातील अंकुर हॉस्पीटल येथे घेवृन गेलो. त्यांनी तिला तपासले व जळगांव येथे घेवून जावे असा सल्ला दिला. त्यानंतर मी माझ्या पत्नीला होती त्या अवस्थेत शहरातील वृंदावन हॉस्पीटल येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करुन माझ्या पत्नीचे सिजर केले. बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी बाळाला वैद्यकीय उपचार दयावा लागेल म्हणुन त्याला शहरातील सिध्दीविनायक हॉस्पीटल मध्ये दाखल केले असून त्याला काचेच्या पेटीत ठेवले आहे.
आज माझ्या पत्नीला या सर्व घटनेमुळे खुप शारीरीक व मानसिक त्रास झाला. तिला रक्ताची बाटली लावावी लागली. व बाळाला काचेच्या पेटीत ठेवावे लागले. या सर्व घटनेस जबाबदार असलेल्या ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे दिनांक २३/०४/२०२४ रोजी सेवेत असलेल्या सर्व डॉक्टर व महिला कर्मचारी जबाबदार आहेत.
संपुर्ण भारतात शासनाकडून वैद्यकिय सेवेबद्दल वेगवेगळ्या योजना कार्यान्वीत असताना साधी रुग्णवाहीकाही उपलब्ध करुन दिली जात नाही अशा सर्वैौंवर योग्य ती कारवाई करावी व मला न्याय दयावा. या कर्मचारी वर्गाने पुन्हा असले कोणत्याही रुग्णाच्या जिवाशी खेळू नये यासाठी कठोर पावले उचलावी. व बाळाच्या जिवास काही एक झाल्यास ग्रामीण रुग्णालय पाचोरा कार्यालयातील कर्मचारीच जबाबदार असतील याची नोंद घ्यावी.अशी विनंती केली आहे.तक्रारीच्या प्रती,जिल्हाधिकारी जळगाव,जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव,प्रांताधीकारी पाचोरा यांना दिल्या आहेत.
“देवतारी त्याला कोण मारी”
बाळातिन अंकीता ही बाळ जन्म प्रक्रीया सुरू असतांना रिक्षातुन दोन दवाखान्यांमध्ये जाउन आल्याने बाळाच्या डोक्याला सुज आली होती.त्यामुळे त्याला श्वास घेण्यास ञास होत होता.त्याची आॅक्सिजन लेव्हलही कमी झाली अशा अवस्थेत शहरातिल सिध्दिविनायक हाॅस्पिटलचे संचालक डाॅ.स्वप्निल पाटील व बालरोग तज्ञ डाॅ.गिरिष्मा स्वप्निल पाटील यांनी बाळाला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले.
मी काही दिवसांपासुन रजेवर असुन आज जळगाव येथे बैठकीस आलो असुन मला या प्रकरणाची कोणतीहु माहीती प्राप्त नाही.या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाही करेल अशी माहीती डाॅ.सतिष टाक यांनी दै.नजरकैद शी बोलतांना सगितले.
मानुसकीला काळीमा फासणार्या या घटनेस जबाबदार असलेल्या ग्रामीण रूग्णालयातिल कर्तव्यावर असलेल्या “त्या” सर्व कर्मच्यावर कठोर कारवाही होउन पुन्हा भविष्यात अशी घटना घडणार नाही याकडे ग्रामिण रूग्णालयाचे अधिक्षक लक्ष देतील की,आपल्याच कर्मच्यार्यांना पाठीशी घालतात याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.










