जळगाव : ईडी कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून मनी लॉन्ड्रींगमध्ये तुमचे बैंक खाते आलेय. ईडीच्या कारवाई पासून वाचण्यासाठी शहरातील एका डॉक्टरकडून थेट ऑनलाईन १९ लाख २० हजार रुपये उकळण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून डॉक्टर यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली दरम्यान फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
शहरातील ५९ वर्षीय एका डॉक्टरांशी १ मे रोजी अंकुश वर्मा आणि सुनीलकुमार नामक व्यक्तींनी संपर्क साधला. आम्ही ईडी कार्यालयातून बोलत असून मनी लॉन्ड्रींगमध्ये तुमचे बँक खाते आले आहे. त्यात तुमचा सहभाग आहे असे दिसतेय. त्यातून बाहेर पडायचे असेल तर आम्ही सांगू तसे वागा असे या व्यक्तींनी डॉक्टरांना सांगितले. त्यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक पाठवून त्यात पैसे टाकण्यास सांगितले. घाबरलेल्या या डॉक्टरांनी १ मे ते १८ मेपर्यंत संशयितांच्या खात्यात एकूण १९ लाख २० हजार रुपये पाठविले. मात्र आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर या डॉक्टरांनी सोमवार, २० मे रोजी सायबर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविली. त्यानंतर मंगळवार, २१ मे रोजी त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष येऊन फिर्याद दाखल दिली आहे.संपर्क साधणाऱ्यांनी डॉक्टरांना पैसे मागण्यासाठी व्हाईस व व्हिडिओ कॉलदेखील केले. हे संशयित उत्तर भारतातील असण्याची शक्यता आहे. तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.
#edrecovery #eatingdisorderrecovery #recovery #mentalhealth #anorexiarecovery #anorexia #anorexianervosarecovery #eatingdisorder #edwarrior #recoveryispossible #ed #anarecovery #anorexiafighter #mentalhealthawareness #selflove #bulimiarecovery #edfighter #recoverywin #edrecoverywarrior #bodypositivity #intuitiveeating #haes #eatingdisorderawareness #bulimia #bodypositive #selfcare #food #fearfood #anorexiarecover #mentalhealthmatters










