वाघारी, ता. जामनेर – तालुक्यातील वाघरी येथे ऐन उन्हाळ्यात ग्रामपंचायतीचे आर ओ प्लांट बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहे, जिल्ह्यात उन्हाची लाट असतांना राज्यातील सर्वाधिक तापमान जळगाव जिल्ह्यात नोंद होतं असताना नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळणं क्रमप्राप्त असणं अपेक्षित असताना आरओप्लांट बंद अवस्थेत असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ
आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!
धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध
जळगावातील हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ; दोघा आरोपिंना घेतले ताब्यात
१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती
जळगावात एकाचा निघृण खून ; घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
ग्रामपंचायतचा आरओ प्लांट बंद असल्याने गावातील नागरिकांना विहिरीचे व बोरवेल तसेच हातपंपाचे दूषित पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून गावातील नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे यासाठी राज्य शासनाने पाच लाख रुपये खर्च करून वाघारी येथे आर ओ प्लांट बसविला आहे चार महिन्यापासून आर ओ प्लांट बंद अवस्थेत आहे तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला नागरिकांनी याबाबत प्रश्न विचारले असता या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे.तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.गावकऱ्यांना शुद्ध पाण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागेल असं बोललं जात आहे.










