Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Kokan news ; कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडीदेवी भक्तांसाठी आनंदाची बातमी…

najarkaid by najarkaid
November 9, 2022
in राज्य
0
Kokan news ; कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडीदेवी भक्तांसाठी आनंदाची बातमी…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. 9 :- कोकणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडीदेवी मंदिर परिसरातील संपूर्ण रस्त्यांचा तातडीने विकास करण्यात येणार आहे. आंगणेवाडीतील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला.

या सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करुन सुस्थितीत करण्याच्या कामासाठी रुपये १० कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आंगणेवाडी परिसरातील नागरी सुविधा व विकास कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या परिसराचा कायापालट होणार आहे.

आंगणेवाडीमधील सोयी-सुविधांसाठी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ताब्यातील दोन इतर जिल्हा मार्ग व एक ग्रामीण मार्ग दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे आता डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये काळसे कट्टा रस्ता, मालवण-बेळणा रस्ता, गोळवण-पोईब रस्ता, ओझर-कांदळगाव मागवणे मसुरे-बांदिवडे-आडवली-भटवाडी रस्ता, राठीवडे-हिवाळे-ओवळीये-कसाल-ओसरगाव रस्ता, चौके-धामापूर रस्ता व कुमामे-नांदोस-तिरवडे-सावरवाड रस्ता या सर्व रस्त्यांचा यामध्ये समावेश असून या रस्त्यांच्या सुसज्जीकरणासाठी १० कोटी ६० लाखांचा निधी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी मंजूर केला आहे.

आंगणेवाडी हे मालवण तालुक्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असून तेथील भराडीदेवी हे सुप्रसिद्ध आहे. दरवर्षी भराडीदेवीच्या यात्रेकरिता मुंबईसह महाराष्ट्रातून दरवर्षी सूमारे ५ लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील तारकर्ली व देवबाग येथील समुद्र किनारे व प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला येथे भेट देण्याकरिता ऑक्टोबर व मे महिन्यांच्या दरम्यान पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मंजूर केलेले हे रस्ते आंगणेवाडीला जाणारे प्रमुख रस्ते असल्याने या रस्त्यांवरुन वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.

म्हणूनच हे रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती करण्याचा निर्णय पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी घेतला आहे.  तसेच, बिळवस आंगणेवाडी रस्ता हा ४.३०० कि.मी. लांबीच्या या रस्त्याचे कामसुद्धा आता लवकरच सुरु होणार आहे. तसेच, चौके आमडोस माळगांव मांगवणे आंगणेवाडी रस्ता हा एकूण २२.२०० कि.मी. लांबीच्या रस्त्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यामध्ये दर्जोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे लवकरच येथील सर्व रस्ते सुसज्ज व दर्जेदार होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कोल्हापूर-चंदगड-तिल्लारी दोडामार्ग रस्त्यावरील मोठ्या धोकादायक पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला असून या कामासाठी सुमारे २ कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

आंगणेवाडीतील भराडीदेवीची यात्रा दरवर्षी साधारणत: फेब्रुवारी मार्चमध्ये होत असते. या यात्रेपूर्वी या प्रमुख रस्त्यांची कामे व येथील मंदिर परिसर सुसज्ज करण्याच्या दृष्टीने विभागाला आदेश देण्यात आले आहेत. आंगणेवाडीतील विकासकामे, महत्त्वपूर्ण सोयीसुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही.  पुढील वर्षी आंगणेवाडी यात्रेच्या पूर्वीच सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon news ; जळगाव जिल्ह्यातील थेट सरपंचपदांसह १४० ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार

Next Post

न्यायालय निकाल ; अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
न्यायालय निकाल ; अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

न्यायालय निकाल ; अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us