Instagram friendship rape case| इंस्टाग्रामवरून मैत्री झाली,इंस्टाग्रामवरची मैत्री ठरली अभिशाप,अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.सोशल मीडियावरचा साप अखेर डसला.

Instagram friendship rape case: सोशल मीडियावरून ओळख, नंतर अत्याचार
इंस्टाग्रामवरून मैत्री करून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातून उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने अंजनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हे पण वाचा: Low Sodium Salt ; सावधान…जास्त मीठ खातायं, उच्च रक्तदाब, लकवा, हृदयरोग, मूत्रपिंड विकार यांचा धोका
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता ही १७ वर्षे ९ महिने वयाची असून, तिची इंस्टाग्रामवरून मृदुल उर्फ गोलू प्रकाश कोकाटे (वय २७, रा. अंजनगाव सुर्जी) याच्याशी ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर आरोपीने “तू मला आवडतेस” असे सांगून तिला आपल्या घरी भेटायला बोलावले.
हे पण वाचा: : आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये

ही भेट उन्हाळ्याच्या सुट्टीत २०२४ मध्ये झाली होती. यावेळी आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने विरोध केला असता, आरोपीने “मी गळफास घेऊन मरेल” अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने तिच्याशी पुन्हा पुन्हा जबरदस्तीने संबंध ठेवले.
हे पण वाचा: Oppo Reno 15 Pro 5G मोबाईल Launched in India ;108MP Camera, 8000mAh Battery फक्त ₹13,999 मध्ये!
दि. १८ एप्रिल २०२४ ते १३ मार्च २०२५ या कालावधीत आरोपीने पीडितेवर मानसिक आणि शारीरिक दबाव टाकत वारंवार अत्याचार केला. नंतर मुलीने त्याच्याशी बोलणे थांबवले असता, त्याने तिच्या पालकांना शिवीगाळ केली आणि आत्महत्येची धमकी दिली.

१६ जुलै रोजी पीडिता शाळेत जात असताना आरोपीने पुन्हा तिला अडवून जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला. नकार दिल्याने त्याने तिच्याशी मारहाण केली आणि ओढत नेण्याचा प्रयत्न केला. यानंतर पीडितेने आईसोबत पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.
हे पण वाचा : WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (POCSO Act 2012) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 345/025, 64(1), 64(2)(म), 126(1), 115(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?
WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध
PM Kisan Samman Nidhi: ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही 20 वा हप्ता – तुमचं नाव यादीत आहे का?
Oppo Reno 15 Pro 5G मोबाईल Launched in India ;108MP Camera, 8000mAh Battery फक्त ₹13,999 मध्ये!
Jalgaon news : आमच्या मुलीला गळफास देऊन मारलं? आईचा अश्रूंनी भरलेल्या आवाजात आक्रोश!
“Supreme Court ची थेट विचारणा – ‘हॉटेलमध्ये वारंवार गेलीस कशासाठी?’”
Lumpy Skin Disease Alert in Jalgaon – जळगाव जिल्ह्यात लंपीचा धोका वाढतोय
Maharashtra Teacher Quality Award | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवे निकष!
Maratha Reservation | मराठा आरक्षण अंतिम सुनावणी, मोठी अपडेट वाचा
Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
Illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता
Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?
आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये
‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा