- प्रत्येक लाभार्थ्यांना मास्क व सॅनिटाईजर वाटप

रावेर, (प्रतिनिधी)तालुक्यातील खिर्डी खुर्द येथे स्वस्त धान्य दुकानात नुकताच शिस्तबद्ध पद्धतीने मोफत तांदूळ वाटप करण्यात आले.रेशन दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत मोफत तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. अंत्योदय लाभार्थी आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्यवर्गातील घटकातील लाभार्थ्यांची मोफत तांदूळ घेण्यासाठी गावातील नागरिकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टनसिंग च्या नियमानुसार रांगेत लागून तांदूळ घेतले. तसेच स्वस्त रेशनदुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील यांच्या कडून प्रत्येक लाभार्थ्यांना मास्क व सॅनिटाईजर चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे,रावेर रेशन दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील,मंडळ अधिकारी मिना तडवी,तलाठी एफ.एस.खान,खिर्डी खुर्द सरपंच ज्योती कोळी,ग्रामसेवक जी.टी. सोनवणे,पोलीस पाटील प्रदीप पाटील,ग्रामपंचायत सदस्य निळकंठ बढे,रमेश कोळी,अनंता कोळी,तसेच लोकांमध्ये सोशल डिस्टनसिंग चे महत्व पटवून देण्यासाठी खिर्डी खुर्द येथील अंगणवाडी सेविका वंदना पाटील,मालतीबाई महाजन,दिपाली चौधरी या मध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.















