चाळीसगाव (प्रतिनिधी) – वडाळा वडाळी तालुका चाळीसगाव येथे जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कर्तुत्वाने राज्य केले असे युगपुरुष भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालय व समाज मंदिर या दोन्ही ठिकाणी लॉक डाऊन चे पालन करून सुरक्षित अंतर ठेवून जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी सरपंच अशोक आमले, ग्रामसेवक जगदीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक मोरे, रवींद्र आमले, संजय आमले, दादाभाऊ आमले, पत्रकार भोजराज आमले, पत्रकार किशोर शेवरे, जगदीश अहिरराव, सुनील अहिरराव, रोहिदास आमले, बळवंत आमले निंबा मरसाळे, आदि ग्रामस्थ उपस्थित होते.