Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठी शाळा टिकवण्यावर भर: वर्षा गायकवाड

najarkaid by najarkaid
February 15, 2020
in शैक्षणिक, राज्य
0
मराठी शाळा टिकवण्यावर भर: वर्षा गायकवाड
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – मराठी शाळा  टिकवण्यासोबतच त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असून, त्यासाठीच शाळांत मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा बंद करण्याऐवजी गुणवत्तापूर्ण शिक्षण  देणाऱ्या सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा कसा वाढेल, यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. शिक्षण विभागाशी संबंधित शिष्यवृत्ती योजनांसोबतच इतर योजनांचा आढावा घेण्यासाठी लवकरच तज्ज्ञांची एक ‘थिंक टँक’ निर्माण केली जाणार आहे,’ अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

बालभारती संस्थेच्या ‘ई-बालभारती’ प्रकल्पाच्या व्हर्च्युअल क्लासरुम व स्टुडिओचे उद्घाटन केल्यानंतर गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादात गायकवाड यांनी माहिती दिली. गायकवाड म्हणाल्या, ‘मंत्री म्हणून माझी इच्छा आहे, की आज ज्या शाळा चांगल्या पद्धतीने सुरू असतील, त्या शाळांची गुणवत्ता वाढू शकते. त्यासाठी प्रयत्न करावा. सरकारी शाळांतूनच उत्तम विद्यार्थी घडावेत, हाच प्रयत्न असेल. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांत प्रवेश घेतला पाहिजे.’ विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली, तर शिक्षकांनाही इतर ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाल्या, ‘शिक्षण विभागाकडून काही दिवसांपूर्वी नववी ते १२वीपर्यंतच्या वर्गांना शिकवण्यासाठी ८३८ उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात आली आहेत. खासगी शाळांतील शिक्षकभरती पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी शिक्षक विभाग प्रयत्नशील असून, न्यायालयाच्या आदेशांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.’ स्वयंअर्थसाह्यित शाळांचे शुल्क ठरविण्यासाठी समिती आहे. त्याद्वारे शुल्कावर नियंत्रण ठेवण्यात येते. या शुल्काबाबत काही तक्रार असल्यास पालकांना तक्रार करण्यासाठी एक समिती आहे. या समितीत सुधारणा करण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना सूचना केल्या आहेत. शिक्षण आयुक्तांच्या सुधारणांनंतर, त्यानुसार समितीत बदल करून शुल्कनियंत्रणासाठी ठोस पर्याय निर्माण करण्यात येईल. येत्या सहा महिन्यांत शिक्षण विभागात आश्वासक बदल दिसतील, असे गायकवाड यांनी सांगितले.

‘शिक्षणाचा पॅटर्न तयार करू’

दिल्ली, तेलंगण, राजस्थान, आंध्र प्रदेश या राज्यात शाळांसाठी काही चांगले प्रयोग होत आहेत. त्यांचे चांगले काम घेऊन, महाराष्ट्रातही शाळांबाबत चांगली कामे करता येतील. महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रात अग्रणी आहे; तरीही विविध राज्यांतील शिक्षणातील प्रयोगांचा विचार करून, त्यापुढे जाऊन महाराष्ट्रात ‘शिक्षणाचा एक पॅटर्न’ तयार केला जाईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.

‘ई-बालभारती’ चॅनेल दीड महिन्यात

बालचित्रवाणीत उपलब्ध असणाऱ्या आधुनिक साधनसामुग्री आणि उपकरणांच्या साह्याने ‘ई-बालभारती’चे चॅनेल सुरू करण्यात येईल. विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून चालणाऱ्या ‘ई-बालभारती’चे चॅनेल येत्या दीड महिन्यात सुरू करण्यात येईल. त्या माध्यमातून विद्यार्थी-शिक्षकांना मार्गदर्शनपर कार्यक्रम, प्रशिक्षणासंबंधी उपक्रम, खेळांचे महत्त्व, व्हर्च्युअल क्लासरूममध्ये होणारे कार्यक्रम आदींचे प्रसारण करण्यात येईल. त्यासोबतच बालचित्रवाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘ई-बालभारती’ चॅनेलमध्ये सामावून घेण्याबाबत चाचपणी करण्यात येईल. त्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बालवर्गाची क्षेत्रभेट उत्साहात संपन्न

Next Post

परदेशी इतिहास शिकवण्यापेक्षा आपला इतिहास शिकवा: राज ठाकरे

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
परदेशी इतिहास शिकवण्यापेक्षा आपला इतिहास शिकवा: राज ठाकरे

परदेशी इतिहास शिकवण्यापेक्षा आपला इतिहास शिकवा: राज ठाकरे

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us