जळगाव -कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित स्वायत्त मू. जे.महाविद्यालय, जळगाव. यांच्या शैक्षणिक करारातंर्गत माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हापरिषद, जळगाव आणि संस्कृतभारती जळगाव या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित, पाच दिवसीय शिक्षणकौशल्य संवर्धन कार्यशाळा मूलजी जेठा महाविद्यालयामध्ये, सोहम् सभागृह, ग्रंथालय इमारत येथे दि. ०३ ते ०७ पर्यत सकाळी १० ते ५ या वेळेत संपन्न झाली
. या कार्यशाळेच्या समारोपास आशिष सैतवाल यांनी शिबीर गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. समारोप कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विवेकानंद प्रतिष्ठानचे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य धनंजय मधुकर जकातदार उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत मूळ घटक पोहचावा असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा प्रशाळेचे प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर यांनी भूषविले. भाषेचे उत्तम ज्ञान भाषेचे प्राध्यापकच करतात असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीश चीपळोणकर यांनी केले. अहवाल वाचन प्रा. प्रीती शुक्ल यांनी केले. त्यानंतर प्रशिक्षणार्थी मधून सुरेखा शिवरामे आणि अतुल मनोहर यांनी कार्यशाळेबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रमुख अतिथी आणि अध्यक्षीय भाषणानंतर ऋणनिर्देशन संस्कृत विभागप्रमुख प्रा. डॉ. भाग्यश्री भलवतकर यांनी केले. आणि सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी योगिता अमृतकर यांनी केले. आणि एकात्मता मात्राद्वारे कार्यशाळेचा समारोपकार्यक्रम संपन्न झाला.या उपक्रमासाठी डॉ. स.ना. भारंबे आणि भाषा प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. भूपेंद्र केसुर यांचेविशेष मार्गदर्शन लाभले. कमलाकर पाटील,संगणक विभाग आणि जनसंज्ञापण विभाग आदींचे सहकार्य लाभले.














