नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एनसीसी कॅडेट्सना संबोधित करताना शेजारी देश असलेल्या पाकिस्तानला नाव न घेता इशारा दिला. भारताकडून तीन-तीन युद्ध हरलो आहोत, हे शेजारी देशाला चांगलंच ठाऊक आहे. भारतीय लष्कराला वाटलं तर, आठवडा किंवा दहा दिवसांत हरवू शकते, असं ते म्हणाले.
यावेळी मोदींनी काँग्रेस, बसपसह विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. आधीच्या सरकारांनी कैक दशकांपासून संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायदा रखडवला आणि व्होटबँकेचं राजकारण करत राहिले, असा आरोप त्यांनी केला.
पाकिस्तानचा नामोल्लेख न करता मोदींनी त्यांना इशारा दिला. आपल्याला माहीत आहे की, शेजारी देश आपल्याकडून तीन-तीन युद्ध हरला आहे. आपल्या सैन्याला त्यांना धूळ चारण्यासाठी दहा दिवसच लागतील. अनेक दशकांपासून भारताविरोधात छुपे युद्ध करत आहे. यात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. आमचे जवान शहीद होत आहेत, असं मोदी म्हणाले.














