नवी दिल्ली – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाचे निवडणूक प्रभारी राधामोहन सिंह यांना नड्डांचे नाव सुचवले होते. यामुळे नड्डा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल, असं सांगण्यात येत होतं. अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नड्डा हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झाले होते. लोप्रोफाइल असलेले आणि वादग्रस्त ववक्त्यांपासून दूरच राहणारे अतिशय प्रभावी नेते, अशी नड्डांची ओळख आहे.















