निजामाबाद – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर निशाना साधला आहे. भागवत यांच्या लोकसंख्येवरील विधानाला प्रत्युत्तर देताना ओवैसी म्हणाले की, आज देशाची खरी समस्या लोकसंख्या नाही तर बेरोजगारी आहे. शनिवारी निजामाबादमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरएसएसवर मुस्लिमांची संख्या कमी करण्याचा आरोपली लावला आहे. मोहन भागवत यांनी गुरुवारी मुरादाबादमध्ये लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी दोन आपत्यांचा कायदा करण्याची गरज असल्याचे म्हटले होते.
ओवैसी पुढे म्हणाले की, “मला तुमच्या विधानाची लाज वाटते. माझे दोनपेक्षा जास्त मुले आहेत, अनेक भाजप नेत्यांचे दोनपेक्षा जास्त मुले आहेत. संघ नेहमी मुस्लिमांची संख्या कमी करण्यावर विधान करत असतो. या देशाची खरी समस्या बेरोजगारी आहे.”
5 वर्षात कोणालाच नोकरी मिळाली नाही – ओवैसी
पुढे ते म्हणाले की, “आज भारतात 60% लोक 40 पेक्षा कमी वयाचे आहेत, पण मागील 5 वर्षात मोदी सरकार कोणालाच नोकरी देऊ शकला नाही. त्यामुळेच आरएसएस दोन मुलांची निती आणण्याचा प्रयत्न करत आहे. एका रिपोर्टनुसार 2018 मध्ये दररोज 36 बेरोजगार आणि 35 नोकरदारांनी आत्महत्या केल्या आहेत. भागवतांनी यावर काही बोलावे. “













