Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटस ५ विकेटने पराभव..

najarkaid by najarkaid
April 27, 2026
in राज्य
0
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.२७ प्रतिनिधी – रोमांचक आणि थरारक सामन्यांनी जैन ड्रीम स्पेसेस वर रंगलेल्या जळगाव क्रिकेट लिगचा अंतिम सामना अमळनेर सुहांस जायंट्स व जळगाव कोगटा किंग्ज मध्ये झाला. पुर्वेस चौधरीच्या मॅचविनिंग खेळीने जळगाव कोगटा किंग्ज यंदाच्या जेसीएलच्या चषकावर आपले नाव कोरले.

जळगाव कोगटा किंग्स ने नाणेफेक जिंकून कर्णधार जगदीश झोपे यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अचूक गोलंदाजीच्या जोरावर अमळनेर सुहांस जायटंसच्या फलंदाजांना अंकूश लावला. तत्पूर्वी सलामीचे फलंदाज मानव टिपरेवाल व ऋषी यादव यांनी आक्रमक खेळाला सुरवात केली मात्र ऋषी यादवचा कर्णधार जगदीश झोपेच्या बॉलवर पूर्वेस चौधरीने झेल घेतला एक षटकार एक चौकार लगावत 10 चेंडू मध्ये 13 धावा काढून तो बाद झाला. नंतर लगेचच ४.६ षटकात एक षटकार आणि तीन चौकार च्या साह्याने 26 धावा काढून मानव टिपरेवाल धावचित झाला. यानंतर क्वालिफायर च्या पहिल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणारे शुभम शर्मा ४३ चेंडूत ६२ धावा त्यात ९ चौकार, २ षटकार तर रणजित निकम ने २९ चेंडूत ४७ धावा, ३ चौकार व ३ षटकार लगावले. ८ गडीच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात १६६ धावा धावफलकावर लगावल्यात. जळगाव कोगटा किंग्ज चे कर्णधार जगदीश झोपे याने ४ षटकात १८ धावा देत ४ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. उबेद खाटिक याने ३ षटकात १३ धावा देत ३ विकेट घेतल्यात.

जळगाव कोगटा किंग्ज आक्रमक फलंदाज ओम भोसले याने १९ चेंडू ३४ धावा ५ चौकार, १ षटकार त्याच्यासोबत जितेंद्र निकम याने ३२ चेंडूत ४ चौकारच्या मदतीने ३३ धावा करुन ५० रनांची ताबडतोब सलामी दिली. त्यानंतर मनिष चौहान २५ चेंडूत ३६ धावा ३ षटकार व २ चौकार तसेच पुर्वेस चौधरीचे २२ चेंडूत ५ उत्तूंग षटकांरांसह  ४३ धावा करुन जळगाव क्रिकेट लिगच्या दुसऱ्या पर्वाच्या चषकावर आपले नाव कोरले. जळगाव कोगटा किंग्ज ने १८.२ षटकात ५ गडींच्या मोबदल्यात १७१ धावा करुन विजय मिळविला. शुभम शर्मा याने ४ षटकात त्यात एक निर्धाव षटक टाकत अवघ्या ५ धावा दिल्यात. त्याला सतीश चतुर्वेदी याने ४ षटकात ३६ धावा देत ३ महत्त्वपूर्ण बळी घेतले. गौरव ठाकूर याने एक गडी बाद केला.

ग्रॅण्ड फायनलची ग्रॅण्ड एन्ट्री..

जळगाव क्रिकेट लिगची ग्रॅण्ड फायनलचा उद्गघाटन सोहळा ग्रॅण्ड झाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, युसूफ मकरा, बाफना ज्वेलर्सचे सिद्धार्थ बाफना, आदित्य फार्मचे यश सुनील मंत्री, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालाचे जयवंत नागूलकर उपस्थीत होते. मान्यरांच्या हस्ते ज्यांनी जेसीएल आयोजनासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे सत्कार करण्यात आले . अखिलेश तिलकपूरे यांच्या विद्यार्थ्यांनी नृत्य करुन प्रेक्षकांची मने जिंकली. जेसीएलच्या सीजन फर्स्ट मध्ये विजेत्या रामलाल चौबे ट्रस्टच्या संघाचा कर्णधार शशांक अत्तरदे व संघमालक प्रकाश चौबे हे चषक घेऊन क्रीडांगणात ग्रॅण्ड एन्ट्री केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी रोहन घुगे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट संघा चे अध्यक्ष अतुल जैन, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी दोन्ही संघांचे खेळाडूसुद्धा उपस्थित होते.

पालकमंत्र्यांकडून नियोजनाचे कौतूक

जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीने जैन ड्रीम स्पेसेस च्या भव्य क्रीडांगणावर आयोजीत केलेल्या  जळगाव क्रिकेट लिग चे नियोजनाबद्दल आयोजक अशोक जैन, अतुल जैन यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष कौतूक करुन आभार मानले.

जळगाव क्रिकेट लिगमध्ये पारितोषिकांचा वर्षाव

जळगाव क्रिकेट लिग स्पर्धेत यंदा विजेत्या व खेळाडूंवर लाखोंच्या पारितोषिकांचा वर्षाव करण्यात आला. संघांसह वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही आकर्षक बक्षिसे दिली गेलीत. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनसह गौराई नर्सरी, वर्धमान हॉस्पीटल, पगारिया ऑटो, नवरंग चहा, सोना आसाराम महाजन अॅण्ड सन्स, नेक्सा, सुरेश कलेक्शन, रॉबीन स्पोर्ट्स यांनी पारितोषीकांचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. अंतिम सामन्यामध्ये सामनावीर म्हणून पुर्वेश चौधरी याला सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी अशोक जैन, अतुल जैन, मयंक पारिख, रिषभ दुसाने, संदीप काबरा, युसूफ मकरा, विवेक जोशी, आनंद मल्हारा, राहूल पवार, डॉ. पराग नहाटा, अमर कुकरेजा, चंदन महाजन, अनिश शहा, भारती चौधरी, दर्शना चौधरी, प्रमोद कोगटा, अतुल कोगटा, प्रतीक जीवरन उपस्थित होते.  याप्रसंगी खेळांडूच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त केले.

संघ पारितोषिके : –

चॅम्पियन्स जळगाव कोगटा किंग्ज संघाला ₹2,00,000 रोख पारितोषीकासह चॅम्पियन्स ट्रॉफी

उपविजेत्या अमळनेर सुहांस जायंटस संघाला ₹1,00,000 रोख पारितोषीकासह ट्रॉफी

तृतीय क्रमांक  – ₹50,000, जामनेर सातपुडा हिरोज

चतुर्थ क्रमांक – ₹50,000, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंन्जर्स

फेअर प्ले अवॉर्ड – ₹20,000, अमळनेर सुहांस जायंटस्

वैयक्तिक विशेष कामगिरी पुरस्कार :

  • अमळनेर सुहांस जायंटचा शुभम शर्मा ला प्लेअर ऑफ द लीग म्हणून पल्सर मोटारसायकल, बॅट, पॅड्स, ग्लोव्हज, किट बॅग व ट्रॉफी

  • जळगाव कोगटा किंग्जचा ओम भोसले याला बेस्ट फलंदाज म्हणून ऑरेंज कॅपसह ₹15,000, रोख रक्कम  बॅट, ग्लोव्हज, किट बॅग, ट्रॉफी

  • जामनेर सातपुडा हिरोजचा रवि पाटील याला बेस्ट गोलंदाज म्हणून पर्पल कॅपने व ₹15,000, रोख रक्कम  क्रिकेट शुज, किट बॅग, ट्रॉफी

  • अमळनेर उदयोमुख खेळाडू – शूज व ट्रॉफी

  • सर्वाधिक सिक्सेस – ₹7,500, रोख रक्कम ओम भोसले

  • सर्वाधिक डॉट बॉल्स – ₹7,500 रोख रक्कम

  • बेस्ट कॅच – ₹10,000 रोख रक्कम

सहा संघातील १०८ खेळाडूंनी दाखविले आपले कौशल्य

जळगाव कोगटा किंग संघ मालक प्रेम कोगटा, अतुल कोगटा, प्रणव कोगटा, कर्णधार जगदीश झोपे, प्रशिक्षक घनश्याम चौधरी, जामनेर सातपूडा हिरोज् संघ मालक किरण बच्छाव, कर्णधार शतायू कुलकर्णी, प्रशिक्षक मुस्ताक अली, पाचोरा एसकेटी योद्धाज संघ मालक हेमंत कोठारी, प्रणव कोठारी, कर्णधार सचिन चौधरी, प्रशिक्षक पंकज महाजन, चाळिसगाव एसपीसीसी चॅलेंर्ज्स संघ मालक सागर पार्क क्रिकेट क्लब, कर्णधार ओम मुंडे, प्रशिक्षक सचिन सोनवणे, रावेर रॉयल्स संघ मालक सीए महावीर जैन, विमल जैन, अखिल बनवट कर्णधार धवल हेमनानी, प्रशिक्षक तन्वीर अहमद, अमळनेर सुहांस जायंटस संघ मालक संदीप काबरा, श्रेयांस काबरा, कर्णधार शुभम शर्मा, प्रशिक्षक राहूल निंभोरे अशा सहा टीमसह १०८ खेळांडूंनी जळगाव क्रिकेट लिगचा महाकुंभमध्ये आपले कौशल्य पणाला लावले.

आकर्षक रोषणाईला प्रेक्षकांची दाद… 

मेहरुण तलावाच्या जवळ असलेल्या निसर्गरम्य वातावरणातील जैन ड्रीम स्पेसेस क्रीडांगण रविवारी रात्री झालेल्या जळगाव क्रिकेट लिगच्या अंतीम सामन्यासाठी जळगावकरांनी उदंड प्रतिसाद दिला. अक्षरशा:   जागा मिळेल तिकडे प्रेक्षकांनी सामनाचा आनंद घेतला. आकर्षक रोषणाई व डिजेच्या तालावर जळगाव कोगटा किंग्ज ने विजयाची धाव घेताच एकच जल्लोष प्रेक्षकांनी केला. प्रेक्षकांच्या गर्दीने जळगाव क्रिकेट लीग मधील गर्दीचा विक्रम मोडला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

Next Post

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Next Post
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us