Manoj Jarange Mumbai Morcha : मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराठीत आंदोलकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. मनोज जरांगे पाटील आज लाखो बांधवांसह मुंबईकडे रवाना होणार आहेत.
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज निर्णायक टप्पा गाठला आहे. आंतरवाली सराठीत पहाटेपासून मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर जमला असून, परिसरात उत्साह आणि तणावाचं वातावरण आहे. पार्किंगमध्ये उभ्या गाड्यांचे फोटो समोर आल्यानंतर लोक थक्क झाले आहेत. गर्दी इतकी प्रचंड आहे की संपूर्ण परिसराला मेळाव्याचं स्वरूप आलं आहे.

मुंबईकडे निघणार मनोज जरांगे
आज सकाळी १० वाजता मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराठीतून मुंबईकडे रवाना होणार आहेत. लाखो मराठा बांधव त्यांच्यासोबत मुंबईकडे निघणार असून, या मोर्च्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा – मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या
आझाद मैदानावर आंदोलनाची ठाम भूमिका
मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यानंतर देखील जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ते म्हणाले की, “न्यायदेवता आमच्यावर अन्याय करणार नाही. आमचे वकील न्यायालयात बाजू मांडतील. आम्हाला न्याय मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
न्यायालयाचा निर्णय महत्वाचा
आज न्यायालय आंदोलनावरील मनाई कायम ठेवतं का, की अटीशर्तीसह आंदोलनास परवानगी देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जरांगे पाटील यांचा ठाम इशारा आहे की कोणत्याही परिस्थितीत ते आझाद मैदानावर आंदोलन करणारच.
मराठा समाजाची ऐतिहासिक चळवळ
राज्यातील विविध जिल्ह्यांतून मराठा बांधव आंतरवाली सराठीत दाखल झाले आहेत. वातावरणात “आरक्षण हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं” अशा घोषणा घुमत आहेत. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे पाटील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करतील. त्यामुळे मुंबईत मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५
LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी