जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याची घटना, तपास सायबर पोलिसांकडे.ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ, प्रशासनात खळबळ

जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या शिक्षण विभागाच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाने प्रशासन आणि शिक्षकवर्गामध्ये खळबळ उडाली असून तपास सायबर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.सदर घटना उत्तर प्रदेशातील महाराजगंज
नेमकं काय आहे प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी महाराजगंज जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाची ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. या बैठकीचा उद्देश शाळांच्या समस्या थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा होता. बैठकीत जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते.
बैठक सुरु होताच जॅनसन जुनियन नावाने एका अकाऊंटने प्रवेश केला. त्यानंतर स्क्रीन शेअर करत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु करण्यात आला. इतकेच नव्हे, तर अर्जुन नावाच्या आणखी एका अकाऊंटवरूनही अश्लील टिप्पण्या करण्यात आल्या.
बैठक स्थगित, तक्रार दाखल
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बैठक काही काळासाठी स्थगित करण्यात आली. त्यानंतर शिक्षणाधिकारी ऋद्धी पांडे आणि गटशिक्षणाधिकारी सुधामा प्रसाद यांनी तक्रार दाखल केली. कोतवाली पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपास सायबर पोलिसांकडे
यासंदर्भात कोतवालीचे एसएचओ सत्येंद्र राय यांनी सांगितले, “या प्रकरणाचा तपास सायबर पोलीसांकडे सोपवण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून लवकरच कठोर कारवाई करण्यात येईल.”
प्रशासनात खळबळ
शासकीय बैठकीदरम्यान अशा प्रकारचे अश्लील साहित्य प्रसारित झाल्यामुळे जिल्हा प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे. ऑनलाईन मिटिंग्सदरम्यान सुरक्षा उपाययोजना अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित होत आहे.