नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री झालेल्या हिंसक घटनेमुळं राजकीय वातावरण तापलं आहे. ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेवरून भाजप आणि दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला आहे. चेहरे झाकलेल्या हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांवर भ्याडपणे हल्ला केला. जे लोक हिंसेत सामील आहेत, त्यांना तेथे बसलेल्या शक्तींचा पाठिंबा आहे यात शंका नाही, असा आरोप ओवेसी यांनी केला.
जेएनयूमधील हिंसक घटनेबाबत खासदार ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या हिंसक घटनेचा मी निषेध करतो. या हिंसक घटनेत सामील असलेल्यांना तेथील शक्तींचा पाठिंबा आहे, यात शंकाच नाही. चेहरे झाकलेल्यांनी भ्याडपणे विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यांना सळई आणि स्टीक घेऊन जेएनयू कॅम्पसमध्ये जाण्याची परवानगी दिली गेली,’ असा आरोप त्यांनी केला.














