Maharashtra Assembly Fight :महाराष्ट्र विधानसभेत आज शिवसेना आणि भाजप समर्थकांमध्ये हातापायी झाली. ही घटना विधानभवनाच्या इतिहासात प्रथमच घडली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.Maharashtra Assembly Fight
महाराष्ट्र विधानभवनात ऐतिहासिक हातापायी: Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ
विधानभवनाच्या पवित्र परिसरात थेट मारामारी केली, गोंधळ घातला, आणि संसदीय परंपरेची अक्षरशः विटंबना केली.हा लोकशाहीचा अपमान आहे अशा प्रतिक्रिया समाज मनात उमटत आहे.
नेमकं काय घडलं?
17 जुलै 2025, महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात एका काळ्याकुट्ट दिवस नोंदवला गेला. विधानभवनाच्या लॉबीमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या समर्थकांमध्ये प्रत्यक्ष हातापायी झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेने राजकारण चांगलंच तापलं आहे.

जुन्या विषयावरून Maharashtra Assembly Fight
एका जुन्या वादावरून – NCP आमदार जितेंद्र आव्हाड आणि BJP आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील कथित वाहन धक्क्यामुळे. आव्हाड यांनी आरोप केला की, “पडळकर यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला, आणि हे सर्व पूर्वनियोजित होतं.
Maharashtra Assembly Fight कशी झाली सुरुवात?
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही गटांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती.पाहता पाहता एकमेकांना धक्काबुक्की आणि नंतर थेट हाणामारी सुरू झाली.या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेमुळे विधानभवनात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान माजी मंत्री आ.जितेंद्र आव्हाड (NCP SP) यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की”माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला म्हणजे मला संपवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.
https://x.com/Awhadspeaks/status/1946071882211660037?t=7HPKLuWhIa05URuzljNZhw&s=19
पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे.
म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता,पळून जाणार पडळकर चे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर..!
सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं..! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही..!
मी इतकच सांगतो,
माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही.!अशी भूमिका घेतली होती.
https://x.com/Awhadspeaks/status/1945923234379289008?t=Yz1EXa9i1Q8XC3Sa4MBYhQ&s=19
👇🏻ह्या व्हिडिओत कुणी मारले कुणी मारायला सांगितले हे स्पष्ट होते – आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला व्हिडीओ पोस्ट पहा.
https://x.com/Awhadspeaks/status/1945891162197487781?t=JElP9Lt04VJMNjhYildSog&s=19
तर भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर (BJP) यांनी”मी काहीही केलं नाही, मला मुद्दाम बदनाम केलं जातंय.”अशी प्रतिक्रिया दिली आहे.

इतिहासातील पहिलीच घटना
विधानभवनात आधी शाब्दिक वाद झाले असतील, पण अशा प्रकारची थेट हातघाई, जिथे सामान्य कार्यकर्त्यांनाही मारहाण झाली ही पहिली घटना आहे.या घटनेने संसदीय शिस्तेचा अपमान झाला असल्याचे मत अनेक ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे.
कायदेशीर कारवाई आणि अपडेट्स
पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे.
FIR दाखल.
घटनास्थळाचे CCTV फुटेज ताब्यात घेतले गेले आहे.
विधिमंडळात नवीन सुरक्षा नियमांची मागणी जोर धरतेय.
ही घटना केवळ दोन नेत्यांमधील वाद नाही, तर ती महाराष्ट्राच्या संसदीय प्रतिष्ठेवर झालेली धक्का आहे. पुढे सरकार काय पावले उचलेल, दोषींवर किती कठोर कारवाई होईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या येथे वाचा एका क्लिकवर👇🏻
‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार
HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!
Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या
Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?
Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला
Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू
Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!
Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!
AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता
What is BTS? : BTS म्हणजे काय?
AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi