Nashik Road Accident : नाशिक येथे वाढदिवसानंतर घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाची झडप, कार अपघातात सात जणांचा मृत्यू. मृतांमध्ये २ वर्षांचा बालक व तीन महिला, दोन जण गंभीर जखमी.

वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या कुटुंबावर काळाची झडप, Nashik Road Accident मध्ये सात जणांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात बुधवारी रात्री 11.30 च्या सुमारास भीषण Nashik Road Accident घडला. वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या नऊ जणांच्या कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील देवठाण येथील दत्तात्रेय पंडित वाघमारे, त्यांच्या पत्नी अनुसयासह नाशिक येथे मोठ्या मुलीच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अल्टो कारने (एमएच 04 डीवाय 6642) गेले होते. त्यांच्यासोबत सारसाळे येथील मुलगी मनीषा गांगोडे, जावई देविदास गांगोडे, दोन वर्षांचा नातू भावेश तसेच मित्र उत्तम जाधव आणि त्यांच्या पत्नी अलका होते.

वाढदिवस कार्यक्रमात जेवण आटोपून सर्वजण बुधवारी रात्री गावाकडे निघाले. दिंडोरीनंतर वणी रस्त्यावरील वळणावर समोरून येणाऱ्या कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अल्टो कारचे पुढील टायर फुटून कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटली.
मृतांची माहिती
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
दत्तात्रेय नामदेव वाघमारे (45),
अनुसया दत्तात्रेय वाघमारे (40),
देविदास पंडित गांगोडे (28),
मनीषा देविदास गांगोडे (23),
भावेश देविदास गांगोडे (2),
उत्तम एकनाथ जाधव (42),
अलका उत्तम जाधव (38)
हे सर्व जण दिंडोरी तालुक्यातील देवठाण, सारसाळे व कोशिंबे गावचे रहिवासी होते.

अपघात कसा घडला?
सदर कुटुंब Alto कार (MH 04 DY 6642) ने नाशिकमध्ये नातवंडाचा वाढदिवस साजरा करून परत जात होते. वणी मार्गावर वळणावर त्यांची समोरून येणाऱ्या दुचाकीशी धडक झाली. टायर फुटल्याने कार खड्ड्यात जाऊन पाण्यात उलटली.
मृत्यूचे कारण
कार खड्ड्यात गेल्यानंतर त्यात पावसाचे पाणी साचलेले होते. दरवाजे उघडता न आल्याने नाकातोंडात पाणी गेल्याने सातही जणांचा मृत्यू झाला.
जखमी दुचाकीस्वार
मंगेश यशवंत कुरघडे (25), रा. पिंपळगाव बहुला
अजय जगन्नाथ गोंद (19), रा. नडगे गोट, ता. जव्हार, जि. पालघर
हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नातेवाईक काय म्हणाले
“सकाळी निघा, उशीर झाला आहे” असे सांगूनही ऐकले नाही, हे ऐकले असते तर आज ही दुर्दैवी घटना टळली असती, अशी खंत नातेवाईकांनी व्यक्त केली.
सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या येथे वाचा एका क्लिकवर👇🏻
‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार
HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!
Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या
Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?
Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला
Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू
Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!
Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!
AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता
What is BTS? : BTS म्हणजे काय?
AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi