मैत्रिणी सोबत खेळत असणाऱ्या दहा वर्षाच्या चिमुकल्या मुलीला खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात मुलीवर लैंगिक अत्याचार केले मुलीनं आरडा ओरड केल्याने बोंब फुटेल या भीतीने नंतर त्याने तिच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृणपणे हत्या करत ठार मारल्याचे भयानक कृत्य केल्याची घटना मुंब्यातील ठाकूरपाडा भागातील सम्राटनगर परिसरामध्ये घडली. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी अटक केलेल्या नराधम आरोपीचे नाव असिफ अकबर मन्सूरी (वय 20) असं असून पोलिसांनी काही तासातचं त्याला अटक केली.
चिमुकलीला इमारतीच्या ‘डक’मध्ये फेकलं
नराधमाने अमानुषपणे मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीच्या मानेवर धारदार शस्राने वार करून तिची हत्या केली पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने सहाव्या मजल्यावरून मुलीला खिडकीतून इमारतीच्या डकमध्ये फेकले. व्हेंटिलेशन डकमध्ये काही पडले असल्याचा आवाज आल्यामुळे इमारतीमधील एका रहिवाशाने पहिल्या मजल्यावरील खिडकीतून खाली बघितले असता, त्यांना डकमध्ये अर्धनग्न अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला. त्याने ही बाब इतर रहिवाशांच्या निर्दशनास आणून दिली आणि भयानक कृत्य उघडकिस आले.या घटनेने संपूर्ण मुंब्रा परिसरातील ठाकूरपाडा परिसरात खळबळ उडाली, त्यानंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

”Beyond Imagination” “अकल्पनीय” सहजपणे कल्पना करू शकत नाही, त्याहूनही पुढे अशी बातमी अलीगडमधून समोर आली आहे. आईने लावलेली माया आईनेच वाया घालवली असून होणाऱ्या जावयासोबत सासू ‘सैराट’ झाली आहे.काही दिवसावरचं लेकीचं लग्न बाकी असतांना नवरी मुलीची आई जावयासोबत पळून गेली.
अलिगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावात घडली असून सासू जावयाच्या सैराट घटनेची परिसरात एकच चर्चा आहे.याप्रकरणी जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जितेंद्रची पत्नी मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्नापूर्वी घरातून पळून गेली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, दोघांनी एकत्र पळ काढला आहे. दोघे घरातून जवळपास त्यांनी सुमारे 3.5 लाख रुपये रोख आणि सुमारे 5 लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिनेही पळवून नेले आहेत.
धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल
वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल