Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात मतदानाची तयारी पूर्ण ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषद

najarkaid by najarkaid
November 18, 2024
in Uncategorized
0
जिल्ह्यात मतदानाची तयारी पूर्ण ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पत्रकार परिषद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रक्रीया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता निर्भय वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजवावा. जिल्हा प्रशसनातर्फे सुरळीतरित्या मतदान प्रक्रिया पार पाडावी

यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली असून नागरीकांनी स्वयस्फुर्तीने मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी प्रचार तोफा थंडावल्यानंतर मतदानाच्या अंतिम तयारीत माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, उपवनसंरक्षक श्री. जमिर शेख, मनपा आयुक्त श्री. ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जळगांव जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजो एकुण 11विधानसभा मतदार संघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विधासभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यात 11 ठिकाणी स्ट्रॉग रुम व मतमोजणी केंद्र करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात एकूण 7 ठिकाणी आंतरराज्यीय तपासणी नाके उभारण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातो 11 विधानसभा मतदार संघात उभारण्यात आलेल्या विविध तपासणी नाक्यांवर व पॉलिस कारवाईत 4 कोटी 74 लक्ष रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलिस दलातर्फे 1 कोटी 92 लक्ष रुपयांची देशी अवैध दारु नष्ट करण्यात आलेली आहे. जिल्हाभर 19 अवैध शस्र, 16 काडतूस, 20 पेक्षा अधिक प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आलेले आहे. 26 लक्ष 67 हजार 677 रुपयांचे अमली पदार्थ जात करण्यात आलेली आहे. पोलिसांनी केलेल्या आतापर्यंत केलेल्या कारवाईत 6 कोटी 40 लक्ष 6599 रुपये किमतीच्या मौल्यवान वस्तु जप्त करण्यात आलेल्या आहेत. तर 4 कोटी 74 लक्ष 97 हजार 988 रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम 126 अन्वये 2921 कलम 127 अन्यये 2, कलम 128 अन्त्रये 55, कलम 129 अन्वये 419, कलम 163 अन्वये 3, कलम 168 अन्वये 1273. मुंबई दारु बंदी कायदा अन्वये 337, महाराष्ट्र झोपडपट्टी दादा निर्मलन कायद्यान्वये 3 जणांवर स्थानबध्दता, मुंबई पोलिस कायदा अन्वये 2 टोळ्यांची हद्दपारी कलम 56 अन्थ्ये 14 जणांची हद्दपारी, कलम 57 अन्वये 1गुन्हेगाराची हडपारी अशा कारवाया करण्यात आलेल्या आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तगडा बंदोबस्त करण्यात आलेला असून एक पोलिस अधिक्षक, 2 अप्पर पोलिस अधिकृक्षक, 8 उपविभागीय पोलिस अधिकारी, 33 पॉलिस निरीक्षक, 149 सहाय्यक / पोलिस उपनिरिक्षक, 2569 पोलिस कर्मचारी यासोबतच अपर पोलिस महासंचालक कार्यालय, राज्य गुन्हे अन्वेशन विभाग, चाललुचपत प्रतिबंध विभाग, मुंबई रेल्वे यासह इतर विभागांकडील ३ उपविभागीय पोलिस अधिकारी, 25 सहाय्यक / उपनिरिक्षक, 1340 पोलिस कर्मचारी, वन विभागाकडील 117 कर्मचारी, 3000 होमगार्ड, तसेच आयटीबीपी 3 कंपनी, सीआरपीएफ 4 कंपनी, आरपीएफ 2 कंपनी, एसएसबी 1 कंपनी, मध्यप्रदेश पोलिस 3 कंपनी, एसआपीएफ 2 कंपनी असे एकूण 14 कंपन्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. यासोबत जिल्ह्यात 122 पेट्रोलिंग वाहने तैनात असणार आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेवेळी ड्रोनव्दारे नजर ठेवण्यात येणार आहे. जळगांव शहर व ग्रामिण भागातील सर्व मतदान केंद्रांची साफसफाई पूर्ण करण्यात आलेली असून मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधा देखिल मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मतदानाच्या वेळी मतदारांना उद्भवणाऱ्या आरोग्याचे प्रश्न लक्षात घेवुन जिल्हाभरात 2735 आशावर्करच्या माध्यमातुन आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत, जिल्ह्यात 3 हजार 683 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली असून मतदान कामकाज कामी 16 हजार 352 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हाभरातील 16 मतदान केंद्रावर मोबाईल नेटकर्व नसल्यामुळे त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हाभरात 2962 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1853 मतदारांनी गृह मतदानाचा फायदा घेतलेला आहे.

सोशल मिडिया तसेच प्रसार माध्यमांवरुन प्रकाशित होणाऱ्या मजकुराच्या प्रमाणिकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणिकीकरण व सनियंत्रण समिती मार्फत एकूण १०९ अर्जाव्दारे जवळपास ३३६ जाहिराती प्रमाणित करुन त्यांना प्रसारित करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे व माध्यम प्रमाणिकीकरण व सनियंत्रण समिती मार्फत प्रमाणित न करता परस्पर सोशल मिडियावरील विविध माध्यमांव्दारे राजकीय व इतर मजूकर प्रसारित केल्याप्रकरणी जिल्हयातील 11 विधानसभा मतदार संघातील 12 उमेदवारांना माध्यम प्रमाणिकीकरण व सनियंत्रण समिती मार्फत कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या, त्यांचे खुलासे घेवून खर्च त्यांच्या उमेदवारी खर्चात दाखविण्याचे काम सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता मतदारांना मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सहाय्यक कामगार आयुक्तांच्या सुचना 

Next Post

विष्णू भंगाळे यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
विष्णू भंगाळे यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी

विष्णू भंगाळे यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी

ताज्या बातम्या

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us