जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात सदा खोत यांनी अनुचित वक्तव्य केले. त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने खोत यांच्या जळगावात जोडेमार आंदोलन करून निषेध करण्यात आला.शरद पवार यांच्याबाबत एका जाहीर सभेत बुधवारी अनुचित वक्तव्य केल्यामुळे राज्यभरात खोत यांचा निषेध केला जात आहे.
खोत यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. खोत यांना कसलीही संस्कृती नसल्याचे पदाधिकारी यांनी मीडियाशी बोलतांना सांगितलं.
अशोक लाडवंजारी,सचिन पाटील, वाय. एस. महाजन, राजू मोरे, किरण राजपूत, सुनील माळी, अशोक पाटील, कलाबाई शिरसाळ, रमेश बहारे, डॉ. रिजवान खाटीक, मजर पठाण,रियाज काकर, राजू बाविस्कर, मतीन सैयद आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.









