जळगाव (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध देवींच्या मंदिरात आ. राजूमामा भोळे मित्र परिवाराकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रसंगी नवरात्रोत्सवानिमित्त आ. राजूमामा भोळे यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
धार्मिक स्थळे व प्रार्थना केंद्रांचे पावित्र्य जपणे, स्वच्छता राखणे हे आपलं आद्यकर्तव्यच होय. नवरात्रोत्सवात शहरातील मंदिरांच्या स्वच्छतेची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले याबद्दल सेवाधारी सेवक म्हणून मी आपला ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत अभियानात जळगाववासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कार्यकर्त्यांनी मेहरूण, पिप्राळा, दाणा बाजार परिसर, महाबळ, निमखेडी रोड, जुने जळगाव आदी भागातील देवींच्या मंदिरात स्वच्छता केली. यावेळी भाविकांनी आ. राजूमामा भोळे यांचे आभार मानले.