Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भोकर पुलामुळे वाचणार केळी उत्पादक शेतकऱ्यांचा वेळ व पैसा

दररोज हजारो लिटर इंधनाची बचत; काम वेगाने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

najarkaid by najarkaid
August 5, 2024
in Uncategorized
0
भोकर पुलामुळे वाचणार केळी उत्पादक शेतकऱ्यांचा वेळ व पैसा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : धरणगाव, चोपडा व जळगाव या तीन तालुक्यांच्या दृष्टीने फायदेशीर असणारा व तापी नदीवरील खेडी व भोकर या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या ६६० मीटर पुलामुळे ७० किलोमीटरचे अंतर अवघ्या १५ किलोमीटरवर येणार आहे. यामुळे ग्रामस्थांना तर याचा फायदा होईलच त्यासोबत परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे दररोज हजारो लिटरचे इंधन तर वाचेलच त्याशिवाय केळीची वाहतूक जलद गतीने होईल.

खेडी-भोकरी ते भोकर दरम्यानचा पूल व्हावा म्हणून गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला होता. या कामांसाठी तब्बल १५२ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. खेडी-भोकर या दोन गावांना खेडी- भोकर ते चोपडा हे अंतर फक्त १५ किलोमीटरचे आहे. मात्र, तापी नदीवरील पुलाअभावी हे अंतर ७० किलोमीटरचे होते. परिणामी शेतकऱ्यांचा व नागरिकांचा वेळ व पैसा देखील खर्च होतो. खेडी-भोकरी व भोकर दरम्यान पूल झाल्यास परिसरातील हजारो ग्रामस्थ व वाहनधारकांचा फेरा वाचणार आहे.

खेडी भोकर, भादली, कठोरा, किनोद, गोरगावले, गाढोदे, करंज, सावखेडा आदी गावातील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी सध्या दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. पुलाअभावी फेऱ्याने जावे लागते. यामुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्यांचा वेळ तर जातोच शिवाय आर्थिक भुर्दंडही बसतो. ना.गुलाबराव पाटील यांनी मध्यंतरी कामाचा आढावा घेवून पुलाचे कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, आतापर्यंत सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. जलद गतीने काम सुरु असून नजिकच्या काळात ते पूर्ण होणे अपेक्षित आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा

या परिसरात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. येथून चोपडा, शिरपूर मार्गे मध्यप्रदेश व पुढे उत्तर भारतात केळीची वाहतूक केली जाते. या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर केळी उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. वेळ व पैसा दोन्हींची बचत होईल. या पुलामुळे परिसरातील गावांचा झपाट्याने विकास होईल, असा विश्वास ना.गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

असा असेल पूल

तापी नदीवरील खेडी-भोकरी ते भोकदरम्यानचा पूल हा तब्बल ६६० मीटर लांब आहे. यात प्रत्येकी ३० मीटरचे २२ गाळे असणार आहेत. सदर पुलाच्या दोन्ही बाजूस सुमारे ६५० मीटर लांबीचे पोच रस्ते असतील. दोन्ही बाजूला भराव टिकवून ठेवण्याकरिता बॉक्स रिटर्न व पाइल फाउंडेशनसह रिटेनिंग वॉल असणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

Next Post

अती पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील पंचनामे करुन, अहवाल सादर करा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
Next Post
धरणगावात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटींच्या निधीस मंजुरी !

अती पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील पंचनामे करुन, अहवाल सादर करा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us