Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

najarkaid by najarkaid
August 5, 2024
in Uncategorized
0
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेवर विरोधक टीका करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

त्यामुळे पहिल्या हप्त्याचं काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असून सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला असून बहिणींना मिळणाऱ्या पहिल्या हफ्त्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

नवी मुंबईतील नावेद मुल्ला यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 14 ऑगस्टला वितरीत करण्यात येणारा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. मात्र ही योजना भ्रष्ट कृती असून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे. निवडणुकीत पैसे वाटल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते. मात्र, सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू नसल्यामुळे निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही. त्यामुळे या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

 लाडकी बहीण योजना म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. मुंबई उच्च न्यायालयात आज या याचिकेवर तातडीची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सुनावणीवेळी सरकारी धोरणात हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका फेटाळली आहे.

दरम्यान, न्यायालयाने म्हटले की, आपण कर भरतो म्हणून सुविधा द्या, अशी मागणी आपल्याला करता येत नाही. ‘फी’ आणि ‘कर’ यात फरक आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारने बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय आहे. त्याला आव्हान कसं देता येईल? असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने याचिकाकर्त्याची कानउघडणी केली. त्यांनी म्हटले की, तुम्हाला वाटलं म्हणून अशा पद्धतीनं सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दा पुढे करत धोरणात्मक निर्णयाला आव्हान देता येणार नाही. दरम्यान, योजना समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना विचारात घेऊन आखल्याचा राज्य सरकारने कोर्टात दावा केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपातर्फे 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभर ‘ हर घर तिरंगा ’ अभियान

Next Post

भोकर पुलामुळे वाचणार केळी उत्पादक शेतकऱ्यांचा वेळ व पैसा

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
भोकर पुलामुळे वाचणार केळी उत्पादक शेतकऱ्यांचा वेळ व पैसा

भोकर पुलामुळे वाचणार केळी उत्पादक शेतकऱ्यांचा वेळ व पैसा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us