जळगाव,(प्रतिनिधी)- जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath khadse) यांचा भाजपा प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून रखडला असल्याने खडसे यांच्यावर टीका होतांना दिसते दरम्यान आज एकनाथ खडसेंच्या भाजपातील प्रवेशासंदर्भात भाजपाचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांना पत्रकारांनी विचारला असता, ते म्हणाले, एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. ते थेट दिल्लीत बोलतात. आम्ही कुठे म्हणालो की आम्ही कोण आहोत, असा टोला महाजनांनी खडसेंना लगावला.

लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे? योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता ; अर्ज कसा करावा जाणून घ्या…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला संमती दिल्याचं बोललं जात आहे, असा प्रश्न महाजनांना माध्यामांच्या प्रतिनिधींनी विचारला असता त्यावर उत्तर देताना महाजन म्हणाले, मग चांगलं आहे ना? उशीर कशाला करता? आता काय मुहूर्त काढायचा का? तुम्हीच तारखा देत आहात. आम्ही कुठं काय म्हणत आहोत. तुमचीच तारीख पे तारीख चालली. निवडणुकीच्या आधी येतो, नंतर येतो. आता या लवकर”, असा टोला गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर बोलताना लगावला.
Police bharti ; धावतांना अमळनेरच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी सुनबाई रक्षा खडसे यांच्यासोबत अमित शहा यांची नुकतीच दिल्लीत भेट घेतली होती या भेटी नंतर खडसेंचा प्रवेश लवकरच होईल असं मानलं जातं होतं मात्र अद्यापही खडसेंचा प्रवेश होतं नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. खडसेंच्या भाजपा प्रवेशाचं नेमकं कुठं अडलंय असं बोलल्या जातं आहे.

एकनिष्ठतेचं फळ आणि कार्यशील असलेल्या खा. रक्षा खडसेनां मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद देऊन केंद्रीय नेतृत्वाने खडसेनां एक प्रकारे बळ दिलं आहे असं असलं तरी खडसेंचा भाजपा प्रवेशाला मुहूर्त सापडत नसल्याने भाजपातीलचं एक गट खडसे यांच्यावर टीका करतांना दिसतात. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे, खडसेंच्या भाजपा प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यातील व राज्यातील बदलेलं राजकीय समीकरण पाहायला मिळेल. खडसेंच्या भाजपा प्रवेशानंतर येणाऱ्या काळात फडणवीस व महाजनांसोबत कसं जुळवून घेतात हेही पाहणं महत्वाचं ठरेल.









