पुणे – मामाकडे आलेल्या भाचीला मामा कामावर गेल्यावर मामी तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची, लैंगिक अत्याचार करायची आणि मारून टाकण्याची धमकी द्यायची याबाबतचा उलगडा स्वतः मुलीने आईकडे करत संपूर्ण ‘आपबीती’ सांगितल्याने आईला धक्काचं बसला. दरम्यान या प्रकरणी मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वहिनी विरोधात पीडित मुलीच्या आईने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवील्या नंतर याप्रकरणी मामीला अटक करण्याता आली आहे.
असा झाला उलगडा…
कोरोना काळात जानेवारी ते ऑगस्ट २०२१ मध्ये आईने आपल्या ९ वर्षाच्या मुलीला आपल्या भावाकडे राहण्यासाठी पाठवले होते. दरम्यान मामा कामासाठी बाहेर गेल्यावर मामी चिमुकलीला विवस्त्र करायची व फोटो काढायची, मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील करत होती.काही महिन्यांनंतर मुलगी पुन्हा आपल्या आईकडे घरी आल्या नंतर मुलीने संपूर्ण आपबीती सांगितली हे एकूण आईला धक्काचं बसला सदर घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे.
दरम्यान, पोलीस म्हणाले, की मामी चिमुकलीला मारहाण करायची. तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची तसेच जीवे मारण्याची धमकीही देत होती. यामुळे मुलगी घाबरली होती. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत मामी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.