अमळनेर : व्हॉईस ऑफ मीडिया या देशातील सर्वात मोठ्या व राष्ट्रव्यापी पत्रकार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी (धुळे, जळगाव,नंदुरबार,नासिक व अहमदनगर )अमळनेरचे ज्येष्ठ पत्रकार तथा संघटनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष डिगंबर महाले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांनी श्री. महाले यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या अल्पकालीन कारकिर्दीत दाखविलेली चुणूक लक्षात घेऊन तसेच सुमारे ३५ वर्षांची त्यांची निष्कलंक व दमदार पत्रकारिता लक्षात घेवून करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडी बद्दल संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, संघटनेचे ऊर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, रेडिओ विंगचे अध्यक्ष अमोल देशमुख ,पत्रकार हल्ला विरोधी विंगचे प्रदेशाध्यक्ष संदीप महाजन, व्हाईस ऑफ मीडियाचे अमळनेर तालुका कोषाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.