मुंबई,(प्रतिनिधी)- मासू विद्यार्थी संघटनेचे संस्थापक तथा विधी तज्ज्ञ ॲड. सिद्धार्थ इंगळे यांना विधी व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी “लोकमत द ग्रेट लीगल माइंड्स आयकॉन” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते “लोकमत द ग्रेट लीगल माइंड्स आयकॉन” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विधीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वकिलांचा गौरव करण्यासाठी लोकमत वृत्त समूहाच्या वतीने द ग्रेट लीगल माइंड्स २०२३ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले असून त्या पुस्तकात ॲड. सिद्धार्थ इंगळे यांच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे.ॲड.सिद्धार्थ इंगळे यांना पुरस्कार मिळाल्यानंतर ‘पुरस्कार‘ महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) व कचेरी अँड असोसिएटच्या टीमला समर्पित करीत असल्याचे सांगितलं