संभाजीनगर – संभाजीनगर शहरातील एका हॉटेलच्या खोलीत प्रेमीयुगलाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळउडाली आहे.शहरातील कर्णपूरा परिसरातील हॉटेल पंचवटीत प्रेमीयुगूलाचे मृतदेह गुरूवारी दुपारी हॉटेल प्रशासनाला खोलीतून प्रतिसाद येणे बंद झाल्याने संशय आल्यानंतर ही घटना समोर आली असून ऋषिकेश सुरेश राऊत (२६) आणि दिपाली अशोक मरकड (१८) असे मृत तरुण, तरुणीचे नाव आहे.
दोन दिवसांपासून दोघेही एकाच वेळी अचानक बेपत्ता झाले होते. बुधवारी त्यांनी हॉटेल पंचवटी मध्ये ३०५ क्रमांकाची खोली बुक केली होती. गुरूवारी सकाळी मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. आवाज देऊनही आतून प्रतिसाद येत नसल्याने वेटरने दुसऱ्या चावीने दरवाजा उघडून पाहिल्यावर दोघेही मृत लटकलेल्या अवस्थेत आढळले.
ऋषीकेश व दिपाली दोघेही हॉटेल पंचवटीच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतर कळेल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.