Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गाळ्यांचे सील उघडण्यासाठी महापालिका अधिकार्‍यांकडून खंडणी

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

 मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा खळबळजनक आरोप

जळगाव – मनपा मालकीच्या महात्मा फुले आणि सेन्ट्रल फुले व्यापारी संकुलातील अनधिकृत बांधकाम केलेल्या व दोन दारे असलेल्या 13 गाळ्यांना पालिकेच्या पथकाने सील केले होते. ही कारवाई अन्यायकारक पध्दतीने करण्यात आली असून या गाळेधारकांकडून सील उघडण्यासाठी मोठ्या पैशाची मागणी मनपा अधिकार्‍यांकडून करण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे विरोधीपक्षनेते सुनिल महाजन यांनी केला आहे. तसेच या प्रकाराची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा देखील महाजन यांनी दिला आहे.

महाजन यांनी केली पाहणी – फुले व्यापारी संकुलमध्ये गाळ्यांचा मुळ बांधकामात बदल करुन पार्टिशन टाकून व्यवसाय करणार्‍या गाळ्यांना सील केले.मात्र ही कारवाई अन्यायकारक असल्याचे गाळेधारकांचे म्हणणे आहे. अनेक दुकानदारांचे त्यांच्या दुकानाला नकाशानुसार दोन शटर असून, दोन्ही दरवाजांद्वारे व्यवसाय केला जात असल्याचे म्हणणे आहे. गाळेधारकांच्या मागणीनुसार विरोधी पक्षनेते महाजन यांनी बुधवारी दुपारी फुले मार्केटमध्ये पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक राजू अडवाणी उपस्थित होते.

मनपात खंडणीबहाद्दर सक्रिय – विधानसभा निवडणूकीत गाळेधारकांच्या आश्वासनांची पूर्तता न करता भाजपचे आमदार राजूमामा भोळे यांनी आता निवडणूक आटोपताच त्यांना वार्‍यावर सोडल्याचा आरोप सुनिल महाजन यांनी केला. गाळेधारकांनी थकबाकीची संपूर्ण रक्कम भरली आहे. त्यात आता कॉर्नरच्या दुकानाचे एक शटर सील करून दुसरे शटर उघडे ठेवले आहे. यातून गाळेधारकांवर मोठा अन्याय होत असून, चुकीच्या बाबींना आमचा पाठिंबा नाही; परंतु पालिकेनेच ठराव करून परवानगी दिलेली असताना अचानक या कारवाई मागचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित केला.गाळेधारकांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक गौप्यस्फोट केले. चटईक्षेत्रात व्यवसाय असलेल्या गाळेधारकांना गाळ्यांचे सील उघडण्यासाठी दहा हजार रुपयांपासून तर भविष्यात कारवाई न करण्यासाठी 50 हजारांपर्यंत मागणी केली जात असल्याचे महाजन यांनी सांगितले. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या गाळेधारकांकडून पुन्हा पैशांची मागणी करणे म्हणजे महापालिका प्रशासनात खंडणीबहाद्दर सक्रिय तर झाले नाहीत ना? अशी शंका उपस्थित केली आहे.

लिलाव किंवा नुतनीकरणावर खल – मनपा मालकीच्या 18 व्यापारी संकुलातील 2387 गाळ्यांची मुदत 2012 मध्ये संपुष्टात आली आहे. मनपा प्रशासनाने थकबाकी वसुलीसाठी कलम 81 क ची नोटीस बजावली आहे. काही गाळेधारकांनी पूर्ण थकबाकी तर काही गाळेधारकांनी बिलाच्या रकमेतील काही रकमेचा तर काहींनी एकही रुपया भरणा केलेला नाही.आतापर्यंत पाच संकुलातील गाळेधारकांना नोटीस बजावल्या आहेत.पाच व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून 167 कोटींची मागणी असून आतापर्यंत 57 कोटी रुपये जमा झाले आहे.तसेच बी.जे.संकुलातील 284 गाळेधारकांकडून 47 कोटींची मागणी असताना केवळ 6 कोटी रुपयाचा भरणा झालेला आहे. त्यामुळे कारवाईची मोहीम पून्हा सुरु केली जाणार असल्याचे समजते.दरम्यान,मुदत सपंलेल्या 18 व्यापारी संकुलातील गाळ्यांचे लिलाव करायचे की,नुतनीकरण करायचे यावर प्रशासनाकडून खल सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खडसेंच्या आरोपावर गिरीश महाजनांचे ‘नो कॉमेंट’!

Next Post

आमदार फुटीच्या चर्चेवर भाजप संतापला; शेलार म्हणाले, या चोरांच्या उलट्या बोंबा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us