अहमदनगर । कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी एका कीर्तनावेळी सम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते असं विधान केलं होतं. पण इंदोरीकर महाराज यांना बेताल वक्तव्य करणं भोवलं आहे. या विधानावरून इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
काही महिन्यांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी अहमदनगर येथील आपल्या कीर्तनातील एका कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान केलं होतं. सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर यांनी केलं होतं. त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरून त्यांच्यावर टीका झाली होती.
हे पण वाचा..
राज्यात आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस तर कुठे हवामान कोरडं राहिल? वाचा IMD चा अंदाज?
बिपरजॉय चक्रीवादळ येण्याआधी अशी अवस्था आहे, जर.. हा व्हिडीओ पाहून…
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत संजय राऊतांचा मोठा दावा! काय म्हणाले वाचा..
पुण्यातील लाचखोर IAS अधिकारी अनिल रामोड विरोधात सरकार घेणार मोठा निर्णय..
दरम्यान, अहमदनगर जिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी समितीनं नोटीस बजावून खुलासा मागवला होता. त्यानंतर इंदुरीकरांनी उद्विग्नता व्यक्त करत कीर्तन सोडून शेती करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं इंदुरीकर महाराजांविरोधात औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत इंदुरीकर महाराज यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश खंडपीठाने पोलिसांना दिले आहेत.