पुणे : पुण्यातील लाचखोर अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड याच्याविरोशात आता राज्य सरकारकडून मोठी कारवाई केली जाणार आहे. अनिल रामोड याला निलंबित करावे,याबाबत विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारला निलंबनाचा प्रस्ताव पाठविला आहे.
8 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ९ जून रोजी छापा टाकला होता. त्यानंतर अनिल रामोड याला पोलीस कोठडी दिली गेली. 13 जून रोजी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. रामोड सीबीआय कोठडीनंतर आता येरवडा कारागृहात आहे. त्याचवेळी राज्य सरकारकडून त्याच्यावर मोठी कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भातील अहवाल विभागीय आयुक्तालयाने तयार केला आहे.
काय होणार कारवाई
पुणे विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारला अनिल रामोड याच्यासंदर्भात पत्र पाठवलं आहे. लाचखोर अनिल रामोडला निलंबित करण्यात यावं, यासाठी विभागीय आयुक्तालयाचे थेट राज्य सरकारला पत्र लिहिले आहे.
अनिल रामोड हा विभागीय सध्या कारागृहात असून परंतु जामीन मिळाल्यानंतर तो कार्यालयात रुजू होईल. त्यानंतर आयुक्तालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार करेल. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सीबीआयने विभागीय आयुक्तालयास पाठविलेल्या पत्राद्वारे केली होती. सीबीआयने विभागीय आयुक्तालयास निलंबनाबाबत पाठविलेल्या पत्रानुसार आयुक्तालयाने राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना रामोड याचे निलंबन करण्यात यावे, असे पत्र पाठविले आहे.