पुणे : कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील आंबेगाव तालुक्यात घडलीय. आरती शाम खंडागळे (वय १८) आणि प्रीती श्याम खंडागळे (वय १७) असं मृत्युमुखी पडलेल्या बहिणींची नावे असून या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकी काय आहे घटना?
आरती आणि प्रीती या दोघी सख्ख्या बहिणी त्यांच्या मावस भावाच्या वाढदिवसासाठी १० दिवसांपूर्वी मुंबई बांद्रा येथून पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे आल्या होत्या. बुधवारी त्यांच्या घरी मावस भावाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरम्यान, गुरूवारी दुपारी घोडनदीच्या काठावर आरती, प्रीती यांच्यासमवेत तिची मावस बहिण कावेरी आरझेंडे, वर्षा नारायण घोरपडे, कुशा नारायण घोरपडे गेल्या होत्या.
हे पण वाचा..
फॉर्चुनरला देतेय टक्कर देणारी Blackstorm लाँच ; तुम्हाला ही खास वैशिष्ट्ये मिळतील..
कापूस दराबाबत गिरीश महाजांनी मांडल मत ; म्हणाले..
महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीचा निकाल जाहीर ; पहा विभागीय टक्केवारी
राज्यात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ; हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज
दरम्यान, कावेरी आरझेंडे हिचा पाय सटकून ती घोडनदीच्या पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी आरती व प्रीती पाण्यात उतरल्या. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मात्र पाय घसरून पडलेली कावेरी हिचा जीव वाचला. दोन सख्खा बहिणींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.