जळगाव : कापसाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या घरात अजूनही कापूस पडून आहे. कापसाचे दर वाढणार कि नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून कापसाला भाव नसल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. दरम्यान, अशातच येत्या पंधरा दिवसांत कापूस दराबाबत निर्णय होईल; असे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या (BJP) केंद्रांतील सरकारला व नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कामाची माहिती देण्यासाठी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजन बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी उपस्थित होते.
हे पण वाचा..
महाराष्ट्र बोर्डाच्या 10वीचा निकाल जाहीर ; पहा विभागीय टक्केवारी
राज्यात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ; हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज
खाली कार्पेट, वर रस्ता, ठेकेदाराने केलेल्या बनावटरस्त्याचा पर्दाफाश ; व्हिडीओ व्हायरल
बदलत्या हवामानात मुले पडू शकतात या 3 आजारांना बळी
श्री. महाजन म्हणाले, कि जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटना लक्षात घेता, जिल्ह्यात (Police) पोलीस आयुक्तालय उभारण्याबाबत आपण आग्रही आहोत. त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावाही करीत आहोत. त्याला लवकरच मंजूरी मिळून येत्या दोन महिन्यात जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय उभारण्यात येईल.
दरम्यान, भाजपचे आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ३१ मे ते ३० जूनपर्यंत जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत घरोघरी जावून जनतेला केंद्रातील सरकारच्या कामाची माहिती देण्यात येईल. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे जनसंपर्क अभियान राबवतील.