मुंबई : राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालले असून अशातच एक संतापजनक घटना समोर आलीय. एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधम तरुणाला अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातील गुंदवलीत राहणाऱ्या सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार केला. त्यानंतर या आरोपीने पळ काढला.
हे पण वाचा..
Video : नवीन संसद भवनात 5000 वर्षे जुनी सेंगोलची स्थापना! त्याचा इतिहास आहे रंजक..
आमदार लता सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात, पती चंद्रकांत सोनवणेही होते सोबत
झोक्यातून पडू नये म्हणून रुमाल बांधला, तोच रुमाल चिमुकल्याचा काळ ठरला, जामनेरातील हृदयदायक घटना
या पीडित मुलीने हा सारा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी काल संध्याकाळी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अंधेरी पोलिसांनी आरोपीचा तपास करत त्याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.