मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकालाकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते. अखेर आज 25 मे ला निकाल जाहीर होणार आहे
आज दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजिनल मार्कशीट कॉलेजमधून मिळून जातील.
यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 14,57,293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,92,780 विद्यार्थी तर 6,64,441 विद्यार्थीनी आहेत. एकूण 10,388 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3195 मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
हे पण वाचा..
बदलतेय हवामान ठरणार डोखेदुखी : राज्यात कुठे पावसाचा इशारा तर कुठे उष्णतेचा अलर्ट
अखेर बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर ; सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी
सिनेसृष्टी पुन्हा हादरली! फेम अभिनेत्रीचं कार अपघातात निधन
बारावीच्या परीक्षेचा निकाल कसा पहाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC), दहावी (SSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in जाहीर करतं. पाहा आपण आपला निकाल कसा पाहू शकता.
MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा
Maharashtra HSC result 2023 लिंक आपल्याला होम पेजवर दिसेल. त्यावर क्लिक करा.
त्यानंतर रिझल्ट पेज ओपन होईल
या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचं नाव टाकायचं आहे.
ही माहिती भरुन सबमिट बटणावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला आपल्या स्क्रिनवर निकाल पाहता येईल.
SMS द्वारे कसा पहाणार निकाल?
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जावून आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.