मुंबई : शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन बराच काळ झाला तरी देखील दुसरा मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने अनेक आमदार नाराज आहे. यात विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना पाठींबा देणारे आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी अनेकवेळा जाहीर पणे बोलवून दाखविली होती. मात्र अशातच आता आमदार बच्चू कडू यांनी अखेर मंत्री पदाचा दर्जा जाहीर झाला आहे. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष म्हणून निवड झालीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला. याबाबतचे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी बच्चू कडू हे गेल्या २० वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत दिव्यांग कल्याण विभागाच्या अभियानासाठी बच्चू कडू यांची निवड केली गेली. या निवडीबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे बच्चू कडूंनी आभार मानले.
हे पण वाचा..
सिनेसृष्टी पुन्हा हादरली! फेम अभिनेत्रीचं कार अपघातात निधन
सशस्त्र सीमा बलात बंपर भरती जाहीर ; 10वी,12वीच्या उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी
अजबच ! जळगावात महिलेने दिला २६ बोटांच्या बाळाला जन्म
मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने जनतेची कामे खोळंबली असल्याचं बच्चू कडू म्हणाले होते. मंत्रिमंडळ विस्तार हा मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला व्हायला हवा. एकाच मंत्र्यांकडे अनेक खाती आहेत. मोठी अडचण निर्माण होत आहे. कामाला गती मिळत नाही. जनतेची कामे वेगाने करायची असतील तर विस्तार महत्त्वाचा आहे. जनतेच्या हिशोबाने विस्तार होणं गरजेचं आहे. येत्या निवडणुकीत त्याचा परिणाम होऊ शकतो.