जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव पोलीस दलातील १२ अधिकारी-अंमलदारांना महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक बोधचिन्ह/सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.आज दि.२६/०४/२०२३ रोजी पोलीस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल/ प्रसंसानीय सेवे बद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक/ शौर्य पदक/ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र सन-२०२२ वर्षाकरिता माननीय श्री रजनीश सेठ, पोलीस महासंचालक सो. महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केले व बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र प्राप्त प्रदान झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधीक्षक सो. श्री एम राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक सो. श्री चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक सो. श्री रमेश चोपडे, यांनीही पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र प्राप्त प्रदान झालेल्या अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्थीपत्र प्राप्त प्रदान झालेल्या अधिकारी व अंमलदार पुढील प्रमाणे
०१) पोलीस उप निरीक्षक, विनयकुमार भीमराव देसले, ०२) सहा.पोलीस उप निरीक्षक, संजय हरिदास पवार, ०३) सहा. पोलीस उप निरीक्षक, नरेंद्र हिरालाल कुमावत, ०४) पो. हवा. सचिन सुभाष विसपुते, ०५) पो. हवा. सुनील अर्जुन माळी, ०६) पो. हवा. मनोज काशिनाथ जोशी, ०७) पो. हवा. राजेश प्रभाकर चौधरी, ०८) पो. हवा. सुनील माधव शिरसाठ, ०९) पो. हवा. रवींद्र धोंडू घुगे, १०) पो. ना. विजय अशोक दुसाने, ११) पो. ना. अल्ताफ सत्तार मन्सुरी, १२) पो. ना. अमोल भारत विसपुते.