मुंबई : राज्यातील राजकारणात लवकरच आणखी एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या उलट-सुलट चर्चेला ऊत आला असून यातच अजित पवारांनी सोशल मीडियावरून पक्ष चिन्हाचा फोटो हटवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादीचा लोगो हटवल्याचं समोर आलं आहे. दरम्यान NCP चं नाव कायम ठेवलं आहे.
अजित पवार हे 40 आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले फोटो डिलीट केले आहे.
हे पण वाचा..
15 दिवसात दोन मोठे राजकीय स्फोट होणार ; सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा नेमका काय?
पेट्रोलियम मंत्र्यांनी केली अशी घोषणा.. पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त??
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! धनंजय मुंडे नॉट रिचेबल, चर्चेला उधाण
अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर फोटोवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो कायमस्वरूपी त्यांनी डिलिट केले आहे. त्यामध्ये फोटोमध्ये अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.